पुणे : मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून हवामान खात्याने मान्सूनबाबत महत्वाची अपडेट दिली आहे. मान्सून आज केरळमध्ये दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर महाराष्ट्रात 10 जूनला मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मान्सून सध्या अंदमान आणि निकोबार बेटांपर्यत पोहोचला आहे.
गेल्या दोन दिवसांत मोसमी वारे दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागासह बंगालच्या उपसागरातील दक्षिण भागात पोहोचले आहेत. त्यासोबत मौसमी वाऱ्यांनी अंदमान निकोबार बेटांचा उर्वरित भाग आणि श्रीलंका, मालदीव, कोमोरीनचा बरासचा भाग व्यापला आहे.मान्सून 4 जूनला केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
2018 मध्ये 29 मे रोजी मान्सून वेळेच्या दाखल झाला होता. 2019 मध्ये 8 जून, 2020 मध्ये 1 जून, 2021 मध्ये 3 जून आणि 2022 मध्ये म्हणजे 29 मे रोजी केरळमध्ये मान्सून पोहोचला. तर यावर्षी केरळमध्ये आज मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Rain Update)
हे पण वाचा..
बालासोर दुर्घटनेवर रेल्वेमंत्र्यांचे मोठे वक्तव्य- अपघाताचे कारण सापडले, तपास पूर्ण
रेल्वे कोच फॅक्टरीत परीक्षेशिवाय नोकरीची संधी, 10वी/ITI उत्तीर्ण असाल तर करा अर्ज
नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकाऱ्याकडे सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग पाहून अधिकारी चक्रावले
मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार?
महाराष्ट्रात 10 जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे आता पुढच्या आठवड्यात राज्यात पाऊस सुरु होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे उकाड्यापासून हैराण असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.