जळगाव, (प्रतिनिधी)- दीपस्तंभ फाउंडेशन ही एक स्वयंसेवी संस्था असून २००५ पासून तरुणांच्या गुणवत्तापर्ण शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी कार्यरत आहे.दीपस्तंभ मनोबल प्रकल्पाच्या माध्यमातून जळगाव व पुणे येथे दिव्यांग, अनाथ आणि वंचित ( आर्थिक दृष्ट्या दुर्बल ) ४०० विद्यार्थ्यांना निवासी आणि विनामूल्य स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उच्च शिक्षण उपलब्ध करुन दिले जाते.
मनोबल प्रकल्पात १८ वर्षांवरील अंध, अस्थिव्यंग, कर्णबधिर , अनाथ, आदिवासी व वंचित, ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना निवासी, निशुल्क स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण (UPSC,MPSC, SSC,IBPS, RRB ,MSW ,MBA, law etc Entrance ), उच्च शिक्षण ( BE, BCA, BBA, BA, B.Com, B.Sc, Phd etc ), तंत्रज्ञान प्रशिक्षण, हस्तव्यवसाय प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. अडथळा रहित बांधकाम केलेला प्रकल्प, दिव्यांगांसाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व तंत्रज्ञान व विविध प्रकारच्या दिव्यांगांसाठी आवश्यक असलेले तज्ञ मार्गदर्शक या प्रकल्पाची वैशिष्टे आहेत.
या साठी संस्थेची राष्ट्रीय प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे. १२ वी उत्तीर्ण तसेच पदवीधर विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असणार आहे. १२ वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित बहुपर्यायावर आधारित परीक्षा मराठी, हिंदी आणि इंग्रजी मध्ये घेतली जाणार आहे, त्यानंतर मुलाखती घेतल्या जातील. या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख ७ जून असून प्रवेश परीक्षा ११ जून रोजी घेण्यात येणार आहे. तरी इच्छुक विद्यार्थी www.deepstambhfoundation.org या वेबसाईट वरून नाव नोंदणी करू शकणार आहे. अधिक माहितीसाठी 8149730318 या क्रमांकावर विद्यार्थ्यांनी संपर्क करावा असे आवाहन दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल तर्फे करण्यात आले आहे.