जळगाव | जळगावात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत असून अशातच शहरातील बँकेत शस्त्राच्या बळावर भर दिवसा दरोडा टाकून लाखो रुपयांची रोकड लांबविल्याची घटना समोर आलीय.
कालींका माता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या नजीक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हा दरोडा टाकला असून या घटनेने मोठी शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
हे पण वाचा…
गुरांना पाजण्यासाठी धरणाजवळ गेले अन् दोघे भावंडांसोबत घडला अनर्थ, यावल तालुक्यातील घटना
मान्सूनबाबत महत्वाची अपडेट ; पुढच्या 48 तासात अरबी सुमद्रात बरसणार, महाराष्ट्रात कधी दाखल होणार?
आजपासून देशात ‘हे’ 5 मोठे बदल, LPG सिलेंडर स्वस्त, इलेक्ट्रिक बाईक घेणे महाग..
आज सकाळी नऊ वाजता बँक उघडून नियमीतपणे कारभार सुरू झाल्यानंतर दोन तरुण दुचाकीवरून बँकेत आले आणि त्यांच्याकडे असलेल्या शस्त्राच्या बळावर त्यांनी व्यवस्थापकासह पाच-सहा कर्मचार्यांना धमकावून अंदाजे १५ लाखांपेक्षा रूपयांची रोकड घेऊन पसार झाले. दरम्यान, दरोडेखोरांनी बँकेच्या व्यवस्थापकावर वार करून त्यांना जखमी केलं असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बँकेत धाव घेतली असून श्वास पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.