यावल : तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेल्या निंबादेवी धरणात गुरांना पाणी पाजण्यास गेलेल्या दोन बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. आसाराम शांतीलाल बारेला (वय १४) आणि निरमा किसन बारेला (वय ९) अशी मयत बालकांची नावे आहेत.
यावल तालुक्यातील सावखेडासिमजवळ निंबादेवी धरण आहे. या धरणापासून काही अंतरावर निमछाव तांडा आहे. निमछाव याठिकाणी आदिवासी कुटुंब वास्तव्यास आहेत. निमछाव येथील आसाराम बारेला आणि निरमा बारेला ही दोन्ही जण गुरे चारण्यासाठी गेली होती. गुरे चरता-चरता, गुरांना पाजण्यासाठी दोघेही निंबादेवी धरणाजवळ आली.
याठिकाणी गुरे पाण्यात गेल्याने गुरांच्या पाठोपाठ दोघेही धरणाच्या पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने आसाराम बारेला आणि निरमा हे दोघेही पाण्यात बुडून बेपत्ता झाले. एकाचा पाय घसरला, त्याला वाचवायला दुसरा गेला असता दुसराही धरणात बुडाल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली आहे.
हे पण वाचा…
मान्सूनबाबत महत्वाची अपडेट ; पुढच्या 48 तासात अरबी सुमद्रात बरसणार, महाराष्ट्रात कधी दाखल होणार?
आजपासून देशात ‘हे’ 5 मोठे बदल, LPG सिलेंडर स्वस्त, इलेक्ट्रिक बाईक घेणे महाग..
छ. संभाजीनगर नंतर आता अहमदनगरचं नामांतर.. मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
दोघेही पहिल्यांदाच धरणावर गुरांना पाणी पाजण्यासाठी गेली होती आणि याचदरम्यान अनर्थ घडला अशीही माहिती समोर आली आहे. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय देवरे करीत आहे.
दरम्यान, आसाराम आणि निरमा हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक असून एकाचेळी दोघांच्या मृत्यूने निमछाव तांडा सुन्न झाला आहे.