रायसोनीच्या विध्यार्थ्याचे अभूतपूर्व यश, चाणक्य स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत महाविध्यालयाने मारली बाजी
जळगाव- ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन व चाणक्य आयोजित २३ व्या स्टुडंट मॅनेजमेट गेमच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयाच्या संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरत पुन्हा एकदा रायसोनी महाविध्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. व्यवस्थापन विध्यार्थ्याच्या बोद्धिक विकासाला चालना देण्यासाठी मागील २२ वर्षापासून आयमा व चाणक्य यांच्या सयुंक्त विध्यमाने नवी दिल्ली, चेन्नई, कोईम्बतूर, बॅगलोर, पुणे, नवसारी या प्रगत शहरामध्ये स्टुडंट मॅनेजमेट गेमच्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
सदर राष्ट्रीय स्पर्धेत खानदेशातील स्थानिक विध्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळावी म्हणून जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयाने या स्पर्धेच्या विभागीय फेरीच्या आयोजनाची जबाबदारी स्विकारली होती यावेळी झालेल्या विभागीय फेरीत खानदेशातील विविध महाविद्यालयातील विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. यावेळी झालेल्या स्पर्धेत रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयाच्या संघाने अंतिम फेरी गाठत ता. ३० नोव्हेंबर रोजी कोइम्बुतुर येथे झालेल्या महाअंतिम फेरीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी, सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी, पॅसिफिक युनिव्हर्सिटी- उदयपुर, सिंहगड इस्टीट्यूट-पुणे, आय. एम. एस.-गाजियाबाद, के. आर. मंगलम इस्टीट्यूट- गुडगाव, या सारख्या १५० विविध प्रतिष्टीत मॅनेजमेट संस्थेतील विध्यार्थ्यानीही सहभाग नोंदविला होता. तरी या राष्ट्रीय स्पर्धेतील महाअंतिम फेरीत रायसोनीच्या संघाने यशस्वी मार्गक्रमण करत महाविध्यालयातील यश चोरडिया, प्रिन्स महाजन, प्राची जगवाणी, लविना चौधरी या विध्यार्थ्यानी यश संपादन केले. यावेळी विजयी विध्यार्थ्यानी मनोगत व्यक्त करतांना महाविध्यालायाकडून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्धल आभार व्यक्त केले. तसेच “आयमा” स्पर्धेच्या आयोजकांनी विजयी झालेल्या विध्यार्थ्यांचे कौतुक केले. तरी सहभागी विध्यार्थ्यांना रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले. तर विजयी विध्यार्थ्याचे रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री प्रितम रायसोनी यांनी अभिनंदन केले तसेच महाविद्यालयातील प्रा. मकरंद वाठ, प्रा. कौस्तुभ सावंत, प्रा. प्रशांत देशमुख, प्रा. मोनाली नेवे, प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा. राज कांकरिया, व प्रा. तन्मय भाले यांनी सहकार्य केले.