बॉलिवूड अभिनेते-अभिनेत्री चित्रपटांमध्ये करोडोंचे कपडे घालतात. मग ती देवदासमधील ऐश्वर्या-माधुरीची साडी असो किंवा बाजीराव मस्तानीमधील रणवीर, दिपिकाचे कपडे असोत.या कपड्यांची किंमत लाखो, करोडोंमध्ये असते. पण चित्रपटाचं शुटिंग संपल्यानंतर या कपड्यांचं काय होतं असा प्रश्न अनेकदा लोकांच्या मनात येत असतो. तर मग जाणून घ्या…चित्रपटाचं शुटिंग संपल्यानंतर या कपड्यांचं काय होतं ?
काही सिनेमे बनवताना कोट्यावधी रुपयांचे बजेट असते, चित्रपटाच्या स्टोरी व पात्रा नुसार कापडाची डिझाईन करावी लागते अशात त्या कपडाच्या किंमती लाखो व कोटी पर्यंत सहजच पोहचते तर काही चित्रपट ऐतिहासिक असतात, या सिनेमांच्या व्यक्तिरेखेसोबत त्यांचे कपडेही प्रसिद्ध होतात.अनेकदा शूटिंग संपल्यावर या ड्रेस व कपड्यांचा लिलाव होतो आणि ते विकत घेण्यासाठी लोकही लाखो रुपये खर्च करतात. तुम्हाला ‘देवदास’ चित्रपटातील माधुरी दीक्षितचा हिरवा लेहेंगा आठवत असेल, मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो लेहेंगा 3 कोटी रुपयांना विकला गेला होता अशी माहिती आहे.
पुन्हा होतो वापर
फॅशन स्टायलिश अक्षय त्यागी यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, फिल्म स्टार्सकडून घातले जाणारे हे कपडे नंतर पॅक करून ठेवले जातात. नंतर नव्या अंदाजात त्यांना वेगळ्या ठिकाणी वापरले जातात ऐश्वर्या रायचा ‘कजरा रेमधील ड्रेस ‘कजरा रे’ ऐश्वर्या रायने घातलेल्या ड्रेसमध्ये नंतर बदल करत ‘बँड बाजा बारात’ चित्रपटातील एका डान्सरसाठी वापरण्यात आला होता.
आपल्याला सर्वाना एक नेहमी प्रश्न पडतो तो म्हणजे शूटिंग नंतर हिरो हेरॉईनने वापरलेल्या लाखो रुपयाच्या कपड्यांचं होत काय? आणि याचे उत्तर आपल्याला मनासारखे मिळत नाही. बॉलिवूड इंडस्ट्रीजमध्ये असे लाखो ऍक्टरस आहेत. जे त्याच्या अभिनयामुळे सर्वत्र चर्चेत असतात. अशातच त्यांचे कपडे,त्यांचा मेकअप तसेच त्याचे डिझायनर्स हे त्यांच्या प्रत्येक भूमिकेसाठी त्यांचा कपड्याचे सगळे व्यवहार बघत असतात.
जशी भूमिका तसे कपडे या ऍक्टरस मंडळींना घालावे लागतात. अशावेळी काही काही कपडे हे बरोबर मॅचिंग किंवा या कपड्यांमध्ये बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर अशावेळी हे कपडे त्यांच्या बॅक डान्सर किंवा अगदी खूप छानच असतील तर ऍक्टरस मंडळी त्यांच्या घरी घेऊन जातात. लाखो मध्ये विकले जाणारे हे कपडे चॅरिटीमध्ये दान केले जातात.
बहुतेक वेळा ऍक्टरसने घातलेले कपडे हे त्यांचा कडेच ठेवतात. अगदीच नाहीतर या घातलेल्या कपड्यांचे रिसायकलिंग केले जाते. तसेच या कपड्याचे विशिष्ट असे भाग कापून त्यांचे वेगळ्या स्टाईलचे कपडे तयार केले जातात. हे कपडे तयार करताना नवीन ड्रेसच्या ट्रेंडींनुसार बनवले जातात.
यासोबत स्टार्सनी परिधान केलेल्या कपड्यांचा अनेकदा लिलाव केला जातो. उदाहरण द्यायचे झाले तर, ‘जीने के है चार दिन’ या गाण्यात सलमानने वापरलेला टॉवेल 1 लाख 42 हजारांमध्ये लिलाव झाला. तसेच ‘रोबोट’ चित्रपटात रजनीकांत आणि ऐश्वर्याने घातलेले कपडेही महागडे होते. हे कपडे लिलावाने विकले गेले.