पुणे : महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजेल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे.
दरम्यान, परीक्षेनंतर दहावीचा निकाल कधी लागणार? याची प्रतिक्षा पालकांसह विद्यार्थ्यांना होती. आता ही प्रतिक्षा संपली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च – एप्रिल २०२३ मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.
हे पण वाचा…
ब्रेकिंग ! जळगाव शहरातील SBI बँकेत दरोडा ; लाखोंची रोकड घेऊन दरोडेखोर पसार
गुरांना पाजण्यासाठी धरणाजवळ गेले अन् दोघे भावंडांसोबत घडला अनर्थ, यावल तालुक्यातील घटना
मान्सूनबाबत महत्वाची अपडेट ; पुढच्या 48 तासात अरबी सुमद्रात बरसणार, महाराष्ट्रात कधी दाखल होणार?
राज्यातील एकूण विद्यार्थ्यांमध्ये ८ लाख, ४४ हजार, ११६ विद्यार्थी तर ७ लाख, ३३ हजार, ६७ विद्यार्थिनींनी दहावीची परीक्षा दिली होती. याशिवाय ८ हजार १८९ दिव्यांग विद्यार्थी व ७३ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
काही दिवसापूर्वी महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षा निकाल जाहीर करण्यात आला त्यानंतर दहावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून होते. आता आज दहावीचा निकाल जाहीर केला जात आहे.
निकाल कुठे पाहता येणार?
विद्यार्थ्यांना दहावी निकाल www.mahresult.nic.in, http://sscresult.mkcl.org, https://ssc.mahresults.org.in, www.mahresult.nic.in या वेबसाईटवरपाहता येईल.