मुंबई : सोने आणि चांदीच्या किमतीने फेब्रुवारी, एप्रिल महिन्यात एक एक विक्रम नोंदवला होता. मे महिन्यात सोने नवीन विक्रम गाठेल असे वाटत असताना सोन्याची जोरदार घसरगुंडी उडाली.
सोने प्रति 10 ग्रॅम दोन हजार रुपयांपर्यंत भावात घसरण झाली. अमेरिकेतील घडामोडींचा परिणाम सराफा बाजारावर दिसून येत आहे. चांदीच्या किंमतीत ही घसरण सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण मे महिनाच खरेदीदारांसाठी लक्की ठरला आहे.
हे पण वाचा..
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात मोठी भरती सुरु ; ७वी ते १० वी उत्तीर्णांना नोकरीचा चान्स
आजपासून या राशींचा शुभ काळ सुरू होईल, नशीब सोन्यासारखे चमकेल
आजचा भाव काय
goodreturns च्या आकडेवारीनुसार, 30 मे रोजी, सोन्यात प्रति 10 ग्रॅम 100-120 रुपयांची घसरण झाली. मंगळवारी 22 कॅरेटचा भाव 55,600 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,630 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर एक किलो चांदीत 400 रुपयांची घसरम होऊन भाव 72,600 रुपयांवर पोहचला. IBJA नुसार,मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,402 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर 22 कॅरेटचा भाव 55,328 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर एक किलो चांदीचा भाव 70,861 रुपये आहे.
24, 23, 22 कॅरेटचा भाव
ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,402 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 60,160 रुपये तर 22 कॅरेटचा भाव 55,328 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,302 रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.