जळगाव : जळगावात एका महिलेने तीन मुलींना जन्म दिला. यापैकी एक मुलगी ही सामान्य आहे तर दोन मुलीला शरीराने जुळलेल्या आहेत. त्यांना एकच हृदय व दोन हात, दोन पाय आहेत. दरम्यान दोघेही जुळलेल्या मुली सुखरुप असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जळगाव शहरातील माहेर असलेली विवाहिता मध्यप्रदेशात वास्तव्यास आहे. या विवाहितेला एक मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी या मुलीला गर्भधारणा राहिली, तिच्यावर जळगावातील नवाल हॉस्पिटल, याठिकाणी डॉ. सुदर्शन नवाल यांच्याकडे उपचार सुरु होते. तिची तपासणी केली, त्यावेळी तिच्या गर्भात तीन बाळ असल्याचे दिसून आले.
त्यातील दोघींना एकच धड असून मानेपासून दोघांचे डोके वेगवेगळे असल्याचे स्पष्ट झाले. तिसरा गर्भ मात्र सुरक्षित असल्याचेही तपासणीत निदान झाले. निदानानंतर डॉक्टरांनी विवाहितेच्या पतीसोबत चर्चा केली, त्यानंतर विवाहिता व तिचे पती या दोघांनी प्रसूती करण्याचा निर्णय घेतला.
हे पण वाचा,,
उष्णतेपासून जळगावकरांना मिळणार दिलासा! जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस लावणार हजेरी
ग्राहकांना धक्का! SBI सह ‘या’ बँकांमध्ये 2000 च्या नोटा बदलण्यासाठी लागणार शुल्क
ग्राहकांना झटका! 1 जूनपासून Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर महागणार, पहा किती रुपयांची वाढ होणार..
नोटाबंदी, 370, बालाकोट… 9 वर्षात मोदी सरकारचे धक्कादायक निर्णय
डॉ. नवाल यांनी शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केली. या महिलेने एकाचवेळी तीन मुलींना जन्म दिला आहे. यात एक मुलगी ही सर्वसामान्यपणे जन्माला आली आहे. तर इतर दोघी एकमेकांना जुळलेल्या असून जुळ्या जन्माला आल्या आहेत. नवजात जुळ्या लेकींचा मानेवरचा भाग स्वतंत्र आहे. मात्र शरीर, हात आणि पाय एकत्र जुळलेले आहेत, दोघींना एकत्रच दोन हात आणि दोन पाय आहेत. तर दोघांना हृदय सुध्दा एकच असल्याने एकाच हृदयावर दोघांचाही श्वास आणि जीवन आयुष्यभरासाठी अवलंबून असणार आहे.