जळगाव : मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून तापमानात मोठी वाढ होण्यास सुरुवात झाली. या उकाड्याने जळगावकर अक्षरशः हैराण झाला असून आता मान्सूनची आतुरतेने वाट पाहात आहेत. अशातच आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
राज्यासह जळगाव जिल्ह्यात 29 आणि 30 मे रोजी मान्सूनपूर्व पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच जिल्ह्यात 10 ते 15 जून दरम्यान, मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
हे पण वाचा,,
ग्राहकांना धक्का! SBI सह ‘या’ बँकांमध्ये 2000 च्या नोटा बदलण्यासाठी लागणार शुल्क
ग्राहकांना झटका! 1 जूनपासून Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर महागणार, पहा किती रुपयांची वाढ होणार..
नोटाबंदी, 370, बालाकोट… 9 वर्षात मोदी सरकारचे धक्कादायक निर्णय
शेतकर्यांना वार्यावर सोडून गिरीश महाजन फॉरेन दौर्यावर ; एकनाथ खडसेंची टीका
गेल्या काही दिवसापासून असह्य उकाड्याने जळगावकरांना हैराण करून सोडलं आहे. त्यामुळे जळगावकरांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे. २५ मे ते २७ मे पर्यंत पावसाची स्थिती निर्माण होईल अशी स्थिती होती. परंतु ती स्थिती निर्माण होऊ शकली नाही.
दरम्यान, २९ मे ते १ जून दरम्यान, जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस होणार असल्याची शक्यता आहे. त्यानंतर ढगाळ वातावरण होऊन उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.