जळगाव | शेतकर्यांच्या विविध पिकाला हमीभाव मागणीसाठी जामनेर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या दरम्यान, आमदार एकनाथराव खडसे यांनी उपोषणाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल केला
जळगाव जिल्ह्यामध्ये ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील हे दोघे एकनाथराव शिंदे व फडणवीस यांचे जवळचे असून त्यांनी शेतकर्यांचा पिकाचा हमीभावासाठी बोललं पाहिजे. कारण आज जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकर्याचे नुकसान झाले आहे त्याचबरोबर कपाशी पिकाला भाव मिळत नाही एकेकाळी गिरीश महाजन हे सात हजार रुपये कपाशीला भाव मिळण्यासाठी आंदोलन केले होते मग आता गेले कुठे शेतकर्यांना वार्यावर सोडून ते फॉरेन दौर्यावर फिरत आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली.
हे पण वाचा..
ग्राहकांना झटका! 1 जूनपासून Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर महागणार, पहा किती रुपयांची वाढ होणार..
फेसबुकवर ओळख, लग्न करून तरुणी आली घरी, पण तिच्या कारनाम्याने मुलासह घरचेही चक्रावले..
स्वदेशीच्या नकली वाणांपासून शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी
मान्सूनबाबत मोठी अपडेट : हवामान खात्याने वर्तविला ‘हा’ अंदाज
खडसे पुढे म्हणाले की, आज शेतकर्यांच्या कांद्याला भाव नाही कपाशीला भाव नाही ज्वारीला भाव नाही त्यामुळे शेतकरी हवालदील झाला असून उद्या नवीन कपाशी पिकाची लागवड होणार आहे. मात्र कपाशीला भाव नसल्यामुळे आजही मागच्या वर्षाची कपाशी घरात पडून आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून या शेतकर्यांच्या समस्या कडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही. येणार्या अधिवेशनामध्ये मी शेतकर्यांच्या प्रश्नाबाबत विधानसभेत आवाज उठवणार आहे अशी प्रतिक्रियाजामनेर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे करण्यात आलेल्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषण प्रसंगी बोलताना एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.