जळगाव:- खरीप हंगामासाठी काही दिवस शिल्लक असून शेतकरी शेतीची मशागत करण्यात व्यस्त आहे. कोणते बियाणे घ्यावे याबाबत शेतकऱ्यांमध्ये चर्चा असून विविध कंपन्यांच्या प्रचार गाडया देखील गावोगावी फिरत आहेत.
मागील वर्षी अंकुर सिडसच्या स्वदेशी 5 या प्रचलित वाणाच्या नावाखाली बोगस बियाण्याची विक्री होवून शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती. यात शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. गुजरात राज्यातील आनंद व वडोदरा याठिकाणी कापसाच्या वाणाचे बिजोत्पादन घेतले जाते, मात्र तेथील शेतकऱ्यांनी कापूस पिकाकडे पाठ फिरवली आहे.
हे पण वाचा..
सर्वांसाठी आनंदाची बातमी! ४८ तासात मान्सूनपूर्व पाऊस कोकणात दाखल होणार
HSC Result : आज लागणार 12वीचा निकाल, कसा पहाल निकाल?
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! थकीत चौथा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार
यावर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून सर्वाधिक मागणी असलेली स्वदेशी 5 बियाणे मिळणार नाही. त्यामुळे स्वदेशीच्या नकली वाणांपासून शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी. असे आवाहन कृषि अधिकारी एस. पी. मोरे, मुक्ताईनगर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.