मुबई : मुंबई सत्र न्यायालयाने देहविक्री संबंधित प्रकरणी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली असून देहविक्री करणे हा गुन्हा नाही. मात्र हे सार्वजनिक ठिकाणी केलं जात असेल, तसेच त्यामुळे इतर लोकांना त्रास होत असेल किंवा त्यांना चुकीचे वाटत असेल, तर हे गुन्ह्याच्या श्रेणीत येईल असं म्हटलं आहे.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील मुलुंड परिसरात पोलिसांनी छापा टाकून एका महिलेला वेश्याव्यवसायाच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर महिलेला स्थानिक दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने महिलेला मुंबईतील देवनार येथील सुधारगृहात एक वर्षासाठी पाठवण्याचे आदेश दिले होते.
हे पण वाचा..
जळगाव जिल्ह्यातील ‘या’ चार विभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
लोको पायलट स्टेशनवर ट्रेन थांबवायला विसरला ; चूक लक्ष्यात येताच काय केले वाचा..
भीषण अपघाताने महाराष्ट्र पुन्हा हदरला : 8 जण ठार, 13 जण गंभीर
खळबळजनक! भुसावळ मुलाने केली आईची व पत्नीची हत्या
महिलेला एका वर्षासाठी सुधारगृहात ठेवावे, असे न्यायालयाने म्हटले होते. जेणेकरून तिची योग्य काळजी घेता येईल. दंडाधिकारी न्यायालयाच्या या आदेशाविरोधात महिलेने मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावरच सुनावणी करताना न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. तसेच महिलेला सुधारगृहातून सोडण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाने काय म्हटले?
सत्र न्यायालयाने दंडाधिकारी न्यायालयाचा निर्णय रद्द करत म्हटले की, कलम १९ अन्वये देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात मुक्तपणे फिरण्याचा आणि कुठेही राहण्याचा अधिकार नागरिकांना आहे. या प्रकरणात न्यायालयाने म्हटले की, महिला प्रौढ आणि भारताची नागरिक आहे. अशा परिस्थितीत ती कुठेही राहू शकते आणि कुठेही येऊ-जाऊ शकते. हा तिचा अधिकार आहे. तिला असे करण्यापासून रोखणे हा कलम 19 द्वारे दिलेल्या अधिकारांचे उल्लंघन होईल.