अमळनेर | तालुक्यातील कळमसरा येथील २२ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात पंख्याला ओढणीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.रोहीणी प्रमोद निकम (वय २२) असं मृत विवाहित तरुणीचे नाव असून याघटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
कळमसरे येथील रहिवासी प्रमोद बापु निकम यांचा ग्राहक सेवा केंद्राचा व्यवसाय आहे. ते दुपारी घरी आले असता त्यांना दरवाजा लावलेला आढळल्याने त्यांनी त्यांची पत्नी रोहिणी हिला हाक मारली. मात्र तीने आवाज दिला नसल्याने मागील बाजूस जावून पाहिले असता ती छताच्या पंख्याला लटकलेली दिसली. त्यांनी शेजार्यांना आरोळी मारून बोलविले व तात्काळ खाली उतरवून अमळनेर येथे खाजगी दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. तिथे घेऊन गेले असता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मयत रोहिणी निकम हिला एक दोन वर्षाचा मुलगा आहे. तिने हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबतची माहिती समोर आलेली नाही. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय विनोद पाटील करीत आहेत.