मुंबई : मे हिटचा तडाखा चांगलाच जाणवत असून राज्यातील अनेक शहरांचे तापमान ४० अंशाच्या वर गेले आहे. परंतु हवामान विभागाने आता थंड करणारी बातमी दिली आहे. नैऋत्य मान्सून आता अंदमान समुद्राच्या काही भागात दाखल झाला आहे. अंदमान- निकोबार बेटांपैकी नानकोवरी बेटावर मान्सूननं हजेरी लावली आहे.
दरवर्षी मान्सून अंदमानमध्ये 22 मे रोजी दाखल होतो. मात्र यावर्षी तीन दिवस आधीच मान्सून अंदमानमधील काही भागांमध्ये दाखल झाला आहे.मान्सून केरळमध्ये चार जून रोजी दाखल होण्याची शक्यता आहे.
दरवर्षी केरळमध्ये 1 जूनला पावसाचं आगमन होतं. यंदा मात्र त्याला तीन दिवस उशीर होणार असल्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने केरळमध्ये तीन ते चार जूनपर्यंत मान्सून येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. यामुळे महाराष्ट्रात सात जूनपर्यंत येणार मान्सून मुंबईत यंदा १० किंवा ११ जूनला येणार होता. परंतु आता मान्सून वेळेवर दाखल होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे.