मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने शिंदे- फडणवीस सरकारला अभय मिळाल्यानंतर आत्ता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. याबाबतची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.
शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पुढच्या विस्ताराची तारीख ठरली असून पुढच्याच आठवड्यात मंत्रिमंडळाच्या विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. हा २३ किंवा २४ मे रोजी घेण्याची चर्चा आमदारांमध्ये सुरू आहे. यामध्ये आठ नेत्यांची नावे विशेषताः चर्चेत आहेत.
त्यात भरत गोगवले( जलसंधारण मंत्री), संजय शिरसाठ (परिवहन किंवा समाज कल्याण) बच्चू कडू (दिव्यांग मंत्री)प्रताप सरनाईक , सदा सरवणकर, यामिनी जाधव, अनिल बाबर, चिमन आबा पाटील या आमदारांची वर्णी लागण्याचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश नसल्याने सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. अखेर दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात यामिनी जाधव यांचा समावेश करण्यात आला आहे.