मुंबई : आज तुम्ही सोने किंवा चांदी खरेदीचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी मोठी गुडन्यूज आहे. सोन्याचे दर आठवड्याभरात दोन हजार रुपयांनी घसरले आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
12 मे रोजी सोन्याचे दर जवळपास 62 हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. 24 कॅरेट सोनं खरेदी करणं कठीण असल्याचं वाटत होतं. मात्र पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचे दर 61,190 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 56,090 रुपये झाले आहेत. मागच्या दोन दिवसात साडे सहाशे रुपयांनी स्वस्त झालं आहे.
हे पण वाचा..
महत्वाची बातमी! क्रेडिट-डेबिट कार्डवरून पैसे खर्च करण्याचे नियम बदलले
CRB चा कर्णधार डू प्लेसिसची पत्नी अभिनेत्रीपेक्षा कमी नाही, पहा हे फोटो..
खासगी ट्रॅव्हल्सवाले दरापेक्षा जादा भाडे आकारताय? अशी करा तक्रार
22 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याचा दर 5600 रुपये आहे. तर 8 ग्रॅम सोन्याचा दर ४४ हजार ८७२ रुपये आहे. एक ग्रॅम सोन्याच्या दरात काल आणि आज फार काही फरक झालेला दिसत नाही. मात्र 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याच्या दरात फरक पडला आहे.
येत्या काळात सोनं 65 हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सोन्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर बँका सोनं खरेदी करत आहेत. याशिवाय सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक सोनं खरेदीकडे वळत आहेत.