पाचोरा : पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल अत्याचार पीडित अल्पवयीन १३ वर्षीय मुलीने कन्येला जन्म दिल्याचा प्रकार समोर आला असून दोघांवर उपचार सुरू आहे. याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल असून बुधवारी पोलिसांनी डीएनए टेस्ट साठी सॅम्पल घेण्यात आले आहे.
या घटने बाबत अत्याचार पीडित अल्पवयीन १३ वर्षीय मुलीचे मेहुणे व रावेर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी ही रावेर तालुक्यातील रहिवासी असून मुलीचे दोन भाऊ हे ऊसतोडीचे काम करीत असल्याने मुलगी त्यांच्या सोबत बारामती येथे गेली होती व तिचे आई -वडील हे कामासाठी पाचोरा तालुक्यातील एका खेडेगावात आलेले होते. या ठिकाणी मुलीचे मेहुणे ही राहत असल्याने पीडित मुलगी ही बारामती येथून आपल्या आई वडिलांकडे आली असता मुलीला त्रास होऊ लागल्याने तिला जळगाव सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी मुलीस आठवा महिना लागल्याचे सांगितले व मुलगी ही गर्भवती असल्याने रावेर पोलीस स्टेशनला माहिती कळविण्यात आली.
पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्याद वरून रावेर पोलिसात गुरुन९८/२०२३,भादवी कलम ३७६,(३)५०६, पोक्सो ५ जे (२)(६) नुसार संशयित अल्पवयीन तरुण देवराम उर्फ घेण्या धुलसिंग (लुचा) (वय-१६) (रा.मंगरूळ ता.रावेर) गुन्हा दाखल करण्यात आला होता व तपास पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील यांच्या कडे देण्यात आला संशयित आरोपीस अटक करण्यात आली व जळगाव बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आरोपीची जामिनावर सोडण्यात आले
हे पण वाचा..
धक्कादायक! आधी बलात्कार केला नंतर प्रेयसीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली मिरची पावडर
गुरुवारी तुम्हीही नखे कापताय? मग थांबा.. चुकूनही करू नका हे काम
CRB चा कर्णधार डू प्लेसिसची पत्नी अभिनेत्रीपेक्षा कमी नाही, पहा हे फोटो..
असल्याचे तपासी अधिकारी यांनी सांगितले दरम्यान मंगळवारी सकाळी या अल्पवयीन मुलीस अधिक त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता दुपारी १२:५७ वाजेच्या सुमारास एक गोंडस कन्येला जन्म दिला जन्मास आलेले कन्या ही पूर्ण महिन्याची असून तिचे जन्मतः वजन सव्वा दोन किलो आहे. याबाबत मंगळवारी पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचा मेमो आल्याने पाचोरा पोलिसात नोंद घेण्यात आली व पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस स्टेशनला सदर घटनेची माहिती कळविण्यात आली तपासी अधिकारी दिपाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल अतुल गाडीलोहार,पोलीस नाईक नितीन डांबरे यांनी बुधवारी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात डॉ.भेट दिली व पुढील तपास कामी डीएनए सॅम्पल घेण्यात आले असून पुढील तपास रावेर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील करीत आहे.