सूरत : गुजरातच्या सूरमध्ये प्रियकराविरोधात बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झालाय. प्रेयसीचा नात संपवण्याचा निर्णय आरोपी प्रियकराला पटल नाही. त्याने तरुणीला केबलच्या वायरने माराहण केली व तिच्यावर बलात्कार केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, त्याने पीडित तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पावडर टाकण्याचा अमानवीय प्रकार केला.
आरोपी आधीपासून विवाहित होता. त्याने ही गोष्ट लपवून ठेवली होती. त्याची पत्नी दुसऱ्या गावात राहत होती. त्याने आपण अविवाहित असल्याचे भासवून पीडित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
तरुणीला सत्य माहित नव्हतं, तो पर्यंत दोघांचे प्रेमसंबंध कायम होते. जेव्हा पीडित तरुणीला प्रियकराच आधीच लग्न झालय हे समजलं, त्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. पीडित तरुणीने प्रेमसंबंध संपवण्याचा निर्णय घेतला, असं पोलिसांनी सांगितलं.
आरोपीने दोघांचे खासगी क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेयर करण्याची धमकी दिली. पीडित तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलय. ओलपाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस तपास सुरु आहे.