जळगाव : सध्या उन्हाळी सुट्या सुरु असून यादरम्यान, अनेक लोक फिरण्याचा प्लॅन करतात. मात्र यादरम्यान, खासगी ट्रॅव्हल्सकडून गर्दीच्या हंगामात मागणी पुरवठा यामधील तफावतीमुळे मोठया प्रमाणात भाडेवाढ करुन प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करीत असतात.याबाबत अनेक तक्रारी येत असतात. आता याच पार्श्वभूमीवर कमाल भाडे निश्चित करण्यात आलेले आहे. कमाल भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारल्यास संबधित परवानाधारक वाहतूकदाराविरुध्द मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल. असा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिला आहे.
जळगाव शहरातून खाजगी बसेस या पुणे, मुंबई, नागपूर, सुरत अहमदाबाद या ठिकाणी ये-जा करीत असतात. परिवहन कार्यालयाने खाजगी ट्रॅव्हल्स मालकांना प्रवाश्यांकडून किती भाडे आकारावे याबाबतचा तक्ता तयार करुन दिला असून प्रवाशांच्या सोयीकरीता प्रत्येक खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयात याबाबतचा फलक लावण्याची सूचनाही दिली आहे. तसेच कमाल भाडे दरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसची तपासणीची विशेष मोहिम 16 मे ते 30 जून, 2023 या कालावधीत राबविण्यात येणार आहेत.
हे पण वाचा..
खाजगी पंटरला 1360 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
पारोळा हादरले! वारंवार अत्याचार करून १५ वर्षीय मुलगी गर्भवती
जळगाव जिल्ह्यातील जवानाला आसाममध्ये वीरमरण
सामान्यांसाठी सरकारची जबरदस्त योजना! वार्षिक फक्त 436 रुपये भरा, 2 लाखांपर्यंतचा मिळेल लाभ