नाशिक- राज्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना शासनाने आनंदाची बातमी दिली आहे. आजपासून (दि.०२) पासून सुरु अर्ज प्रक्रियेस सुरवात होणार आहे. दरम्यान नुकतेच गृहविभागाने याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे. ही भरती प्रक्रिया २ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०१९ या कालावधीत पार पडणार आहे. तसेच उमेदवारांना https://www.mahapariksha.gov.in या पोर्टल द्वारे अर्ज सादर करता येणार आहे. तसेच https://www.mahapariksha.gov.in/OnlinePortal/advPoliceII या संकेतस्थळावर आपल्याला जाहिरात पाहावयास मिळणार आहे.