भुसावळ : जळगाव उष्णतेत वाढ झाली असून याचा परिणाम दिसून येत आहे. भुसावळ मधील २९ वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. चार दिवसांपूर्वीच तो शहरात आजीचे तेरावे व १५ दिवसांपूर्वीच जन्मलेल्या आपल्या मुलीला पाहण्यासाठी पुण्यातून आला होता. दरम्यान त्याचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची माहिती डॉ. राजेश मानवतकर यांनी दिली आहे.
गेल्या सहा दिवसांपासून भुसावळ शहराने तापमानात 46 पार केली आहे. अशा या रणरणत्या उन्हात नागरिकांचे जगणे असाह्य झाले आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेचे भीषण परिणाम दिसून येत आहे. भुसावळ शहरातील तुकाराम नगरातील रहिवासी तथा पुणे येथे रेल्वेत सेवारत गिरीश शालिग्राम पाटील (वय २९) या तरुणाचा सोमवारी दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला.
गिरीश शालिग्राम पाटील यांना नुकतेच 15 दिवसापूर्वी कन्यारत्न झाल्यामुळे झेडटीएस येथे गाडगे महाराज मंदिराजवळ मुलीला देखील पाहायला जावून आले. त्यानंतर मात्र भुसावळच्या तीव्र उन्हाने या तरुणाचा बळी घेतला आहे.