रावेर : लालबाग येथील तरुणाचे लग्न रावेर तालुक्यातील रमजीपुर येथील तरुणीशी ठरलं होते. १२ मे रोजी लग्न होते. मात्र लग्नाच्या दिवशी नवरदेवांवर अक्षता पडण्याआधीच पहील्या पत्नीने आमचे लग्न झाले असल्याचा दावा केल्याने, मंडपात गोंधळ उडाला. यावेळी नवरदेवाची चांगलीच पंचाईत झाली.वाद होण्याआधी पोलीस या ठिकाणी पोहचल्याने नवरदेव व त्याची पुण्याहून आलेली पत्नी यांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केल्यावर नवरदेव वैभव याने लग्न केले असल्याचे कबुल केले.
नेमका काय आहे प्रकार?
लालबाग येथील वैभव महाजन बी.ई.झालेला तरुण याने दुसऱ्या समाजातील मुली सोबत लव्ह अँड रिलेशशिपमध्ये राहून नुकतेच दि.१० एप्रिल रोजी पुण्यात देहू येथील अलंकापुरी येथे लग्न लावुन घेतले होते. त्या मुलीला घरी ठेवुन दुसर लग्न करण्यासाठी निघालेल्या या नवरदेवाला अक्षता पडण्याआधी, पहीले लग्न केलेल्या मुलीने थेट मंडपात जाऊन हा विवाह रोखल्याने, नवरदेवाची चांगलीच पंचाईत झाली. वाद होण्याआधी पोलीस या ठिकाणी पोहचल्याने नवरदेव व त्याची पुण्याहून आलेली पत्नी यांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केल्यावर नवरदेव वैभव याने लग्न केले असल्याचे कबुल केले.
यावेळी समाजातील मंडळीने हस्तक्षेप करून आज होणारा विवाह रोखण्याचा निर्णय घेतला. दरम्यान वैभव आपल्या घरी लालबाग आला असता, आईची तब्ब्येत खराब असल्याने, तिला मानसिक त्रास होईल, या विवाह बद्दल घरात कुणालाही काही एक न सांगता समाजातील मुलीशी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहीती त्याने पोलीसांना दिली आहे. पहीली पत्नी वैभवशी बोलत, तो दुसर लग्न करणार नाही अस सांगत होता. मात्र दोन दिवसापासून त्यांने मोबाईल बंद केल्याने, त्यांच्या पत्नीने थेट लग्न स्थळ गाठले, काही क्षणात अक्षता पडतील त्या आधीच तिने हा गौप्यस्फोट केल्याने, मंडपात गोंधळ उडाला.