जळगाव : जळगावात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद होत असून उष्णता प्रचंड वाढली आहे. शुक्रवारीही जळगाव येथे ४५.८ डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. याचदरम्यान, यंदाच्या मोसमातील जळगाव जिल्ह्यातील उष्माघाताचा पहिलाच बळी गेला आहे.
मे हीटच्य्या तडाख्यात विवाहित महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी अमळनेर शहरातील तांबेपुरा भागात घडली. रुपाली गजेंद्रसिंग राजपूत (वय ३३ वर्ष) असे मयत महिलेचे नाव आहे.
अमळनेर शहरातील तांबेपुरा भागात रुपाली राजपूत ह्या या कुटुंबीयांसोबत वास्तव्यास होत्या. रुपाली राजपूत ह्या अमरावती येथे एका विवाह सोहळ्यानिमित्त गेल्या होत्या. सोहळा आटोपून त्या गुरुवार, ११ मे रोजी सायंकाळी रेल्वेने परत अमळनेर शहरात घरी परतल्या. घरी आल्यानंतर अचानक त्यांना मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाला. यामुळे रूपाली यांना पतीने तांबेपुरा येथेच एका खाजगी डॉक्टराना दाखवले. उष्माघाताची लक्षणे असल्याचे सांगत डॉक्टरांनी गोळ्या औषध देऊन प्राथमिक उपचार केले.
हे पण वाचा..
कर्नाटक निकाल! काँग्रेसने विजयी उमेदवारांना दिला ‘हा’ आदेश
बापरे! भुसावळात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद
कर्नाटकचे सुरुवातीचे कल आले ; काँग्रेसची जोरदार मुसंडी, भाजपला मोठा धक्का?
१३ मे रोजी या राशींचे भाग्य सूर्यासारखे चमकेल ; काय म्हणते आज तुमची राशी?
थोडा वेळ रुपाली यांना बरेही वाटले मात्र सकाळी उठल्यानंतर त्यांना पुन्हा उलट्या मळमळ चक्कर सुरू झाल्याने घरच्यांनी सकाळी १०.३० वाजता तात्काळ रिक्षा करून रूपाली यांना शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले. या ठिकाणी पोहाचण्या आधीच रूपाली यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट झाले होणार सदर मृत्यू उष्माघातानेच झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.