- महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचा प्रेरणादायी उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) – आपल्या प्रेरणादायी कार्याने इतरांना दिशा देण्याचे काम प्रत्येक क्षेत्रात अनेकांकडून सातत्याने होत असून ही बाब लक्षात घेऊन सर्व क्षेत्रातील धडपडणार्या उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना समान संधी मिळावी याकरिता निकोप व निस्वार्थ हेतुने
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघ वतीने राजमाता जिजाऊ, महात्मा ज्योतिबा फुले , लोकनेते यशवंतराव चव्हाण, डॉक्टर पंजाबराव देशमुख, मौलाना अबुल कलाम आझाद , स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, लोकनेते गोपीनाथ मुंडे,प्रमोदजी महाजन आदींच्या नावे विविध क्षेत्रातील मानाचा नाविन्यपूर्ण पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून आपापल्या क्षेत्रात सेवाभावी वृत्ती जोपासणाऱ्या उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव तसेच राज्यशासन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष किशोर पाटील कुंझरकर यांनी दिली.
दिनांक 28 नोव्हेंबर 2019 म्हणजे आजपासून सदर प्रस्ताव सादर करावयाचे असून 10डिसेंबर 2019 पर्यंत आदर्श शेतकरी, आदर्श जिल्हा परिषद सदस्य,जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक, संस्थांचे माध्यमिक शिक्षक, खाजगी प्राथमिक शिक्षक, स्वयसेवी संस्था, शिक्षक व इतर संघटना, अल्पसंख्याक शाळा व क्षेत्रात कार्यरत व्यक्ती, विद्या प्राधिकरणातील व राज्यस्तरावरील शिक्षण विभागातील अधिकारी,पत्रकार ,समाजसेवक, उद्योजक, साहित्यिक,शासनाच्या तेजस प्रकल्पांतर्गत कार्य करणारे टॅग कॉर्डिनेटर, केंद्रप्रमुख ,शिक्षण विस्ताराधिकारी , पोलिस व संरक्षण विभाग, अधिकारी विभाग, ग्रामसेवक ,सरपंच, तलाठी, महापालिका, महापौर नगरसेवक, पंचायत समिती सभापती सदस्य,या प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यातील आलेल्या प्रस्तावामधून प्रत्येक क्षेत्रातून एकाची निवड ही निवड समितीमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक तथा सन्मान सोहळ्याचे आयोजक महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले.सदरील व्यापक स्वरूपाचा पुरस्कार सन्मान सोहळा यंदा सर्वस्तरीय व्हावा यासाठी इच्छा सोशल मीडिया व वैयक्तिक अनेकांनी व्यक्त केल्याने या वर्षी विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्यांसाठी पुरस्कार सन्मान सोहळ्याचे दारे खुली करण्यात आली असून हा प्रेरणादायी व महत्वपूर्ण असा उपक्रम सर्वांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे.जळगाव जिल्ह्यातून निवडून आलेले सर्व नवनिर्वाचित आमदार, विविध क्षेत्रातील मान्यवर, मान्यवर दैनिकाचे संपादक,लोकसभा मतदारसंघाचे खासदार, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या वतीने राज्य कार्यकारिणीचे सर्व सदस्य, शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीच्या वतीने राज्य समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी, शिक्षण तज्ञ,जळगाव जिल्हा परिषदेचे प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व शिक्षण विभागाचे सभापती, जिल्हाधिकारी,आदी मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्याचे नियोजन व्यापक मंथन अंतर ठेवण्यात आले असून संबंधितांनी आपले प्रस्ताव हे पासपोर्ट फोटोसह किशोर पाटील कुंझरकर,53 अ, क्षितिज निवास चिमुकले दत्त मंदिराजवळ आदर्श नगर एरंडोल तालुका एरंडोल जिल्हा जळगाव. पिन 425109. मोबाईल नंबर 70 30 88 71 90.
या पत्त्यावर पोस्टाने किंवा स्वतः स्वहस्ते विहित नमुन्यात आपल्या सर्व कार्याची माहिती व कात्रणं सह पाठवावे.
आपले शैक्षणिक सामाजिक कार्य त्याच जोडीने उल्लेखनीय कार्याची एक प्रत स्वहस्ताक्षरात प्रस्तावना जोडायची आहे.प्रत्येक क्षेत्रातील पुरस्काराचे नाव वेगवेगळे राहणार असून आयोजक महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघ आहे. जळगाव जिल्ह्यासह जिल्हास्तरीय सोहळा असून इतर कोणत्याही जिल्ह्यातून आलेले प्रस्ताव स्वीकारण्यात येतील. तरी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन यावेळी संयोजकांच्या वतीने करण्यात आले असून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम सुरू करण्यात सातत्याने महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्यावतीने राज्य समन्वय समितीच्या व सर्व क्षेत्रातील मित्र परिवाराच्या सहकार्य व मदतीने राबविण्याचा मनोदय यावेळी शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक तथा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी व्यक्त केला. आलेल्या प्रस्तावांना मधून निवड समितीमार्फत निवडण्यात आलेल्या प्रस्तावांची यादी अंतिम करण्यात येऊन ती प्रसिद्ध करण्यात येईल तदनंतर राज्य मंत्रिमंडळातील मंत्री महोदय यांचे उपस्थितीत सदरील पुरस्कार सन्मान सोहळा आयोजित करण्यात येईल असेही कुंझरकर यांनी म्हटले.