पुणे : पाकिस्तानला गुप्तचर माहिती दिल्याच्या आरोपाखाली संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना पुण्यातील विशेष एटीएस न्यायालयाने १५ मेपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप प्रदीप कुरुलकरवर आहे.
सध्या गुप्तचर यंत्रणेकडून (RAW) त्यांची चौकशी सुरू आहे. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रदीप कुरुलकरसह अन्य एक अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा एटीएसला संशय आहे.
हे पण वाचा..
नागरिकांनो काळजी घ्या..! जळगावसह राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार, वाचा IMD चा इशारा
खळबळजनक! प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली, बुलढाणा जिल्ह्यातील घटना
मुंबईत 34,800 पगाराच्या नोकरीची संधी.. SEEPZ स्पेशल इकॉनॉमिक्स झोनमार्फत भरती
एटीएसने न्यायालयात असे सांगितले की, ‘जेव्हा ते डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्या कॉल आणि डेटा तपशीलांची छानणी करत होते तेव्हा त्यांना या गुप्तचर विभागात काम करणाऱ्या अन्य अधिकाऱ्याचा नंबर सापडला.’