केरळमधील मलप्पुरममधील तनूरजवळ रविवारी रात्री एक भीषण दुर्घटना घडली. पर्यटकांची बोट उलटून २१ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात झाला तेव्हा बोटीत 40 जण होते. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन सोमवारी सकाळी घटनास्थळी भेट देणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे सोमवारचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
घटनेचे शोक व्यक्त करत पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, केरळमधील मलप्पुरममध्ये बोट पलटी दुर्घटनेत लोकांच्या मृत्यूने मी दुखावलो आहे. शोकग्रस्त कुटुंबियांच्या सांत्वना. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपये दिले जातील.
Malappuram, Kerala | Six people died after a tourist boat capsized near Tanur in Malappuram district of Kerala. Rescue operations are underway. pic.twitter.com/gPi0u2HuIi
— ANI (@ANI) May 7, 2023
मृतांमध्ये बहुतांश मुले आहेत. मलप्पुरम जिल्ह्यातील तनूर भागातील थुवलाथिराम समुद्रकिनाऱ्याजवळ हाऊसबोट उलटल्याची घटना घडली. हाऊसबोटीमध्ये सुमारे 40 लोक होते. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असून यातील बहुतांश मुले शाळेच्या सुट्टीत भेटायला आलेली होती. मात्र, आता मृतांची संख्या २१ झाली आहे.
‘बोटीखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता आहे. त्यांना बाहेर काढावे लागेल. बोट उलटली होती. याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस त्याचा तपास करतील. हाऊसबोट एक खास प्रकारची बोट आहे, ज्याला घरासारखे स्वरूप दिले जाते. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आणि मलप्पुरम जिल्हा दंडाधिकारी यांना आपत्कालीन बचाव कार्य करण्याचे आदेश दिले.