एरंडोल,(प्रतिनिधी)- मौजे पिंपळकोठे प्रचा. ता. एरंडोल शिवार मध्ये शेत गट नं. 15/2/अ क्षेत्र 0.60 आर गटातील विहीरीमध्ये एक तीन HP ची पाण्याची ३० हजार किमतीची पाण्याची बसवलेली मोटर्स चोरीला गेल्याचे उघडकीस आल्याने ऍड. सौ. कांदबरी सुहास सोनवणे वय 30 वर्षे, व्यवसाय वकील (जळगांव) यांनी संशयिता विरुद्ध एरोंडल पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
ऍड. सौ. कांदबरी सुहास सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार म्हटले आहे की,मौजे पिंपळकोठे प्रचा. ता. एरंडोल शिवार मध्ये शेत गट नं. 15/2/अ क्षेत्र 0.60 आर आहे. सदर गटातील विहीरीमध्ये एक तीन HP ची पाण्याची मोटर्स बसवलेली आहे.दि. 26/04/2023 रोजी दुपारी 03.30 वा. सुमारास मी व माझे पती माझे सासू, सासरे, भाचा असे माझे शेतातील गव्हाचे पिक काढुन आम्ही घरी जात असतांना शेतातील विहीरीत डोकावुन पाहीले असता त्यावेळी आमचे शेतातील विहीरीतील पाण्याची मोटर ही जागेवरच होती व आम्ही घरी निघुन गेलो. दि.04/05/2023 दुपारी 01.00 वा. सुमारास मी व माझे पती, सासु असे वादळ पाउस चालु असल्याने आम्ही आमचे शेतातील पत्याचे शेड व शेती पाहण्यासाठी आले असता आम्ही आमचे शेतातील विहीरीत पाहीले असता तेव्हा एक तीन HP ची पाण्याची मोटर्स हि जागेवर दिसली नाही म्हणुन मी व माझे सासरे अशांनी शेतात व आजुबाजुच्या परीसरात बघितले असता एक तीन HP ची पाण्याची मोटर्स मिळुन आली नाही.
तसेच आम्ही आमचे शेतातील आजुबाजुचे शेतकरी रामलाल साळुंखे, ईम्रान पटेल, सुभाष साळुंखे यांना विचारपुस केली असता काहीएक उपयुक्त माहीती मिळुन आली नाही तेव्हा आमची खात्री झाली की एक तीन HP ची पाण्याची मोटर्स अंदाजे 30.000/- रु. किंमतीची हि माझे संमतीवाचून लबाडीच्या ईराद्याने कोणीतर अज्ञात इसमाने चोरुन नेली आहे. म्हणुन आम्ही पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आलो आहे.
तरी दि. 26/04/2023 रोजी 03.30 वा. सुमारास ते दि.04/05/2023 रोजी दुपारी 01.00 वा. सुमारास शेत गट नं. 15/2/अ मधिल एक तीन HP ची पाण्याची मोटर्स अंदाजे 30.000/- रु. किंमतीची माझे संमतीवाचुन लबाडीच्या ईराद्याने कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेली आहे म्हणुन माझी अज्ञात इसमा विरुध्द तक्रार करण्यात आहे.