अहमदपूर(प्रतिनिधी)-पत्रकारीता हा सामाजिक वसा आहे. छोट्या बातमीतुनही मोठा परिणाम होतो. म्हणुनच वृत्तपत्रसृष्टीमुळे लोकशाही खर्या अर्थाने बळकट होत आहे. मात्र त्याच लोकशाहीचा हा चौथा स्तंभ आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत आहे. ही उणीव भरुन काढण्यासाठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे जो प्रयत्न करत आहेत त्यामुळे भविष्यात पत्रकारांना देखील चांगले दिवस येतील असे मत अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त . तर जुनी परंपरा बदलून आता वृत्तपत्राचे अर्थकारण बदलणे काळाची गरज आहे. असे मत पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी व्यक्त केले.
लातुर जिल्ह्यातील अहमदपूर येथे शुक्रवार दि. 5 मे रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, तालुका शाखा अहमदपूरच्या वतीने राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज आदर्श स्मृती पत्रकारीता पुरस्कार पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांना यथोचित सन्मानाने प्रदान करण्यात आला. तसेच कै.पत्रकार गजानन भुसारे स्मृती पुरस्कार अहमदपूरचे ज्येष्ठ पत्रकार दिनकरराव मंदेवाड यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराजांचे उत्तराधिकारी राजशेखर गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तर अध्यक्षस्थानी अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील हे होते. त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवानंद हिंगणे, नुतन संचालक शिवाजीराव खांडेकर, जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव, नगरसेवक अभय मिरकले, डॉ.ऋषीकेश पाटील, पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, लातुरचे जिल्हाध्यक्ष अशोक देडे, अहमदपूर तालुका शाखेचे अध्यक्ष विश्वांभर स्वामी आदि मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले, राजकारण आणि पत्रकारीता हे रेल्वे रुळाच्या दोन पटर्या असुन त्या एकसमान चालल्या तर लोकशाही मजबूत होऊ शकते. या दोन्ही लोकशाहीच्या महत्वपूर्ण खांबाने व्यसनमुक्ती समाज उभा करण्यासाठी एक लोकचळवळ निर्माण करणे गरजेचे आहे. सामाजिक जाणीवेचे भान ठेवून पत्रकार संघाचे वसंतराव मुंडे यांनी आवाहन केल्याप्रमाणे आता वाचकांनी देखील वृत्तपत्रांची किंमत योग्य ती स्वीकारण्याची मानसिकता निर्माण केली पाहिजे. जर वृत्तपत्र टिकली तरच लोकशाही मजबूत राहू शकेल असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे म्हणाले, वृत्तपत्राचे अर्थकारण हे काळानुसार बदलणे गरजेचे आहे. पत्रकारीता अधिक सक्षम होण्यासाठी वृत्तपत्रसृष्टीच्या अर्थकारणावर भर देण्यासाठी आम्ही लोकजागृती चळवळ उभी केली आहे. त्याचे परिणाम आता सकारात्मक दृष्टीकोणातून पुढे येत आहेत असे मत व्यक्त केले. या प्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पत्रकार संघाच्या वतीने महावितरणच्या सत्तर कर्मचार्यांची सर्व रोग निदान मोफत तपासणी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.ऋषीकेश पाटील यांच्या रुग्णालयात करण्यात आली. महावितरणचे शहर अभियंता सतीश गुडे, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष लातुर झोनचे बालाजी कांबळे तसेच राजकुमार पुणे यांची उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष उदय गुंडीले, सचिव शिवाजी गायकवाड, उपाध्यक्ष सुरेश डबीर, बालाजी तोरणे पाटील, कोषाध्यक्ष बालाजी पारेकर, संघटक मासूम शेख, महादेव महाजन, बसवराज पाटील मानखेडकर, चंद्रकांत शिंदे, धम्मानंद कांबळे, अजय भालेराव आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.बालाजी करमुंगीकर व मारुती बुद्रुक पाटील यांनी केले. तर आभार शिवाजी गायकवाड यांनी मानले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास आणि मोफत आरोग्य तपासणी शिबीरास अहमदपूर पंचक्रो