बँक ऑफ बडोदाने विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. पात्र उमेदवार 17 मे 2023 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यामुळे जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
एकूण पदांची संख्या – 157 पदे
या पदांसाठी होणार भरती
रिलेशनशिप मॅनेजर स्केल IV: 20 पदे
रिलेशनशिप मॅनेजर स्केल III: 46 पदे
क्रेडिट विश्लेषक स्केल III: 68 पदे
क्रेडिट विश्लेषक स्केल III: 06 पदे
विदेशी मुद्रा संपादन आणि संबंध व्यवस्थापक स्केल II: 12 पदे
विदेशी मुद्रा संपादन आणि संबंध व्यवस्थापक स्केल III: 05 पदे
आवश्यक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयातील संबंधित विषय असलेले किमान पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. याशिवाय संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभवही मागवण्यात आला आहे.
वयाची अट : 01 एप्रिल 2023 रोजी, किमान वयोमर्यादा 25 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 45 वर्षे आहे.
वेतनश्रेणी :
MMGS II: 48170 x 1740 (1) – 49910 x 1990 (10) – रु 69180
MMGS III: 63840 x 1990 (5) – 73790 x 2220 (2) – रु 78230
SMG/S-IV: 76010 x 2220 (4) – 84890 x 2500 (2) – रु 89890
हे पण वाचा..
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.(NTPC) मध्ये नोकरी संधी.. या पदांच्या 120 जागा रिक्त
10वी ते पदवीधरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! मुंबई येथे 5182 पदांची जम्बो भरती सुरु
मुंबईत 34,800 पगाराच्या नोकरीची संधी.. SEEPZ स्पेशल इकॉनॉमिक्स झोनमार्फत भरती
सरकारच्या ‘या’ कंपनीत गव्हर्मेंट नोकरीचा गोल्डन चान्स..! तब्बल 60000 पगार मिळेल
अर्ज कसा करावा हे माहित आहे?
पायरी 1: सर्वप्रथम bankofbaroda.in या बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
पायरी 2: होम पेजवर, करिअर टॅबमधील ‘करंट ऑपर्च्युनिटीज’ लिंकवर क्लिक करा.
पायरी 3: येथे ‘स्पेशलिस्ट ऑफिसर्स फॉर कॉर्पोरेट आणि इन्स्टिट्यूशनल क्रेडिट विभाग’ वर क्लिक करा. नियमित आधारावर’ लिंकवर आणि ‘आता अर्ज करा’ वर क्लिक करा.
पायरी 4: अर्ज भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फी सबमिट करा.
पायरी 5: तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल, डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी पुष्टीकरण पृष्ठाची प्रिंट आउट घ्या.