पाचोरा येथील बाहेर भागातील उल्हास टाकीज जवळील राहणारे दानशुर व्यक्तीमत्व अबूलेस अलाउद्दीन शेख यांनी कधीही जात पात न पाहता सर्व धर्मीय मैत्री जपली त्यांनी आपल्या वडिलांचा वारसा कायम ठेवून मैत्री जपली आहे पाचोरा शहरातील अल्लाउद्दीन शेख लोखंडाचे खरेदी विक्री करणारे व्यापारी असून त्याचा पाचोरा शहरात नाव लौकिक असून त्यांनी पाचोर्यातील प्रत्येक घटकांशी त्यांचं नाळ जुळली आहे त्यांचा अनुभव व व्यवसाय त्यांचे चिरंजीव अबूलेस यांनी सांभाळून पुढे चालू ठेवला त्यांनी जातपात न पाहता प्रत्येक धर्मीय लोकांशी संबंध ठेवून प्रत्येक समाजाच्या कार्यक्रमात हजर असतात त्यांच्याकडे कुठलाही कार्यक्रम असला तरी प्रत्येकाला बोलवत असतात राजकारणातील सर्व पक्षीय संबंध असून त्यांनी हित जपले आहे.
अबूलेस शेठ यांनी खरोखर माणुसकी जपून कोरोना काळात अक्षरशा लोक मृत्यूला सामोरे जात होते त्या काळात त्यांनी ऑक्सिजन पुरवून लोकांना जीवदान दिले जळगाव जिल्ह्यात ऑक्सिजन मिळत नव्हता त्यावेळेस अबूलेस शेठ यांनी पाचोरा तालुक्यातील कोरोना पेशंट असलेल्या नागरिकांना तसेच दवाखान्यात ऍडमिट असलेल्या पेशंट यांना सुद्धा अत्यंत कमी दरात ऑक्सिजन पुरविला तर काही गरीब व्यक्तींना त्यांनी विनामूल्य ऑक्सिजन पुरविला खऱ्या मदतीला धावून येणारा व्यक्ती म्हणजे अबूलेस शेठ एक सामाजिक माणुसकी जपणारे व्यक्तिमत्व असून त्यांनी ईद निमित्त सर्व पत्रकार बांधवांना बोलवून त्यांचा सत्कार व आदर केला यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व इतर पत्रकारही उपस्थित होते तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
शब्दांकन :- अनिल (आबा) येवले