मुंबई : ऐन लग्नसराईच्या मोसमात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आजही सोन्याचा भाव तेजीत आहे. आज MCX वर सोन्याचा भाव 61,500 च्या पुढे गेला आहे. लवकरच सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. यासोबतच चांदीच्या दरातही वाढ होत आहे. आज चांदीचा भाव 78,000 च्या पुढे गेला आहे. जागतिक बँकिंगच्या चिंतेमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमती झपाट्याने वाढत आहेत.
सोने आणि चांदी किती महाग झाली?
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 0.13 टक्क्यांच्या वाढीसह 61,571 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार करत आहे. यासोबतच चांदीचा भाव 0.16 टक्क्यांच्या वाढीसह 78,161 रुपये प्रति किलोच्या पातळीवर आहे.
फेड रिझर्व्हने व्याजदरात वाढ
जागतिक बाजारपेठेबद्दल बोलायचे तर येथे सोने आणि चांदी हे दोन्ही धातू महाग झाले आहेत. कोमॅक्सवर, सोन्याचा भाव प्रति औंस $2058 आणि चांदीचा भाव $26.31 प्रति औंस आहे. यासोबतच फेड रिझर्व्हने व्याजदरात 25 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे, त्याचाही परिणाम बाजारात दिसून येत आहे.
हे पण वाचा..
दुर्दैवी! देवदर्शनासाठी निघालेल्या भुसावळातील दाम्पत्यावर काळाचा घाला, पती ठार, पत्नी गंभीर जखमी
घरात सून एकटी पाहून सासऱ्याने केलं असं काही.. काय घडलं पुढे वाचा..
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेलाचे दर 15-20 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किमती
तरुणी आजीसोबत टेरेसवर झोपली होती, रात्री तरुण आला अन्…पुढे जे घडलं ते भयंकरच
तर सोन्याचा भाव 68,000 हजाराचा टप्पा गाठणार
तज्ज्ञांनी म्हटले आहे की, 25 बेसिस पॉइंट्सच्या वाढीमुळे अमेरिकेतील व्याजदर 16 वर्षांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. पुढील आर्थिक वर्षात सोन्याचा भाव 66,000-68,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो. त्याच वेळी, पुढील 2 महिन्यांत सोन्याचा भाव 62,500 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर दिसू शकतो.
अॅपद्वारे शुद्धता तपासा
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.