नवी दिल्ली : महागाईच्या काळात कोट्यवधी गृहिणींसाठी दिलासा देणारी बातमी आली आहे. सरकारच्या आवाहनानंतर खाद्यतेल उत्पादक कंपन्यांनी दरात मोठी कपात जाहीर केली आहे. मदर डेअरीने ‘धारा’ ब्रँड अंतर्गत विकल्या जाणाऱ्या खाद्यतेलाच्या एमआरपीमध्ये 15 ते 20 रुपये प्रति लिटर कपात करण्याची घोषणा केली आहे. पुढील आठवड्यात नवीन स्टॉक बाजारात आल्यावर लोकांना किरकोळ बाजारात स्वस्तात खाद्यतेल मिळू शकेल.
अन्न मंत्रालयाने खाद्य तेल संघटनेला (SEA) खाद्यतेलाच्या किमती कमी करण्याचे निर्देश दिले होते, त्यानंतर माडे डेअरीने खाद्यतेलाच्या किमती कमी केल्या आहेत. मदर डेअरीच्या प्रवक्त्याने सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमती कमी झाल्यानंतर आणि देशांतर्गत पिकांचे चांगले उत्पादन झाल्यानंतर, धाराच्या खाद्यतेलाच्या सर्व प्रकारांच्या किमती 15 ते 20 रुपये प्रति लिटरने ताबडतोब कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोयाबीन तेल, राईस ब्रान ऑईल, सूर्यफूल तेल, शेंगदाणा तेलाच्या किमतीत ही कपात करण्यात आली आहे.
धारा रिफाइंड सोयाबीन तेलाच्या एक लिटर पॉलीपॅकच्या किमती 170 रुपयांवरून 150 रुपयांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत. राइस ब्रान ऑइलची किंमत 190 रुपयांवरून 179 रुपये प्रति लीटर झाली आहे. धाराच्या सूर्यफूल तेलाची किंमत 175 रुपयांवरून 160 रुपये प्रति लीटर झाली आहे. शेंगदाणा तेलाचे दर 255 रुपयांवरून 240 रुपये प्रतिलिटर झाले आहेत.
हे पण वाचा..
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण? आज महत्वपूर्ण बैठक
तरुणी आजीसोबत टेरेसवर झोपली होती, रात्री तरुण आला अन्…पुढे जे घडलं ते भयंकरच
भुसावळ हादरले ! १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी अत्याचारातून चार महिन्याची गर्भवती
Amazon ग्रेट समर सेलमध्ये स्मार्टफोनसह इलेक्ट्रिक वस्तूंवर मिळतेय जबरदस्त सूट
सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियानेही आपल्या सदस्यांना गेल्या तीन महिन्यांतील किंमतीतील कपातीचा तपशील अन्न मंत्रालयाला सादर करण्यास सांगितले आहे. यापूर्वी अन्न पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने खाद्यतेल बनवणाऱ्या कंपन्यांना खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यास सांगितले होते. मंत्रालयाचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी होऊनही पॅकेज्ड फूडच्या किमतींइतक्या तेलाच्या किमती कमी झाल्या नाहीत. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारने सेलव्हेंट एक्स्ट्रॅक्ट असोसिएशनच्या सदस्यांना खाद्यतेलाच्या एमआरपीमध्ये कपात करण्यास सांगितले.