राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पावर यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘पवार’फुल वादळ पाहायला मिळाले, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निर्णय मागे घ्या हाच नारा दिला आहे तर सोशल मीडियातून देखील विविध पोस्टच्या माध्यमातून शरद पवारांना निर्णय मागे घेण्यासाठी साकडं घातल्या जातं आहे.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढील नवा अध्यक्ष नेमण्यापासून इतर महत्त्वाच्या निर्णयांसाठी विशेष समिती स्थापन केल्याचेही पवार यांनी भाषणात जाहीर केले होते या समितीत माजी मंत्री प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के. के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, राजेश टोपे, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, फौजिया खान, जितेंद्र आव्हाड, जयदेव गायकवाड, धीरज शर्मा यांच्यासह इतर काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा अक्षरशः बांध फुटला
”साहेब… आम्हाला तुम्हीच हवे आहात, निर्णय मागे घ्या,” अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर दणाणून सोडले होते तर संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येतं एकच मागणी लावून धरण्यात आल्याचे पाहायला मिळाले. नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन ‘फेरविचारासाठी दोन दिवस द्या,’ असे पवार यांनी सांगितले.
नवा अध्यक्ष कोण?
जर शरद पवार राजीनाम्यावर ठाम राहिले त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली, तर सुप्रियाताई, अजितदादा, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील या नावांची चर्चा नव्या अध्यक्ष करिता होत असून नेतृत्वाची धुरा कुणा कडे सोपविली जाईल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.शरद पवार यांनीही काही दिवसांपूर्वीच (२७ एप्रिल) ‘भाकरी फिरविण्याची वेळ आली आहे. ती वेळीच फिरविली नाही तर करपते,’ असे वक्तव्य केले होते.
मी माझं कुटुंब संपवून घेईन
कार्यकर्ते पवारांसमोर भावूक
पवारांच्या राजीनाम्याच्या बातमीने राज्यात घटनांना नाटकीय वळण#राष्ट्रवादी #शरदपवार #NCP pic.twitter.com/tIkIJLOSqJ
— Omkar Wable (@omkarasks) May 2, 2023