Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टुर अॅण्ड ट्रॅव्हल्स चे नावे ऑनलाईन फसवणुक करणारी टोळीला जळगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या

najarkaid live by najarkaid live
May 2, 2023
in जळगाव
0
टुर अॅण्ड ट्रॅव्हल्स चे नावे ऑनलाईन फसवणुक करणारी टोळीला जळगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-टुर अॅण्ड ट्रॅव्हल्स चे नावे ऑनलाईन फसवणुक करणारी कलकत्ता, पश्चिम बंगाल येथील टोळीला जळगाव सायबर पोलीस शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.

सविस्तर असे की, गुन्हयातील फिर्यादी डॉ. उल्हास बेंडाळे व त्यांचे 10 सहकारी मित्र यांना सेव्हन सिस्टर पाहण्यासाठी जायचे होते. त्याअनुषंगाने त्यांनी फेसबुकवर Thinktrip Travels या नावाची जाहिरात पाहिली ज्यात सहली बाबत 7 सिस्टर (नॉर्थ ईस्ट) 20 रात्र 21 दिवसा करिता एका व्यक्तीस 60,000/- रुपये व जोडप्यांसाठी रु.1,20,000/- अशी जाहिरात होती. त्यानुसार फिर्यादी यांनी Thinktrip Travels चे जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्रमांकवर फोन करुन बोलणी करून त्यांचा विश्वास संपादन करून Thinktrip Travels टुर अॅण्ड ट्रॅव्हल्सचे नावाखाली अॅडव्हॉन्स स्वरुपात 3,15,000/- रु. तसेच टुर बुक झाली म्हणुन 7,20,000/- रु. RTPCR व क्वॉरंटाईन झाले तर हॉटेल बुक करण्यासाठी असे 68,800/- रुपये लागतील अशी खोटी बतावणी करुन त्यांनी Thinktrip Travels नावाखाली वेळोवेळी वेगवेगळया कारणांसाठी एकुण 11,03,800/- भरलेले आहेत.

परंतु सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीतांनी फिर्यादी यांचे सहलीसाठी कोणत्याही प्रकारचे बुकिंग न करता बुकींग केल्याचे भासवुन स्वतः चे आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी यांची फसवणुक केली म्हणुन सायबर पो.स्टे. जळगाव येथे भाग-5 गुरनं. 08/2023 भादवि क.409,420,34 सह IT ACT 66 (डी) प्रमाणे दि. 13/03/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचे तपासात मा. पोलीस अधीक्षक जळगाव, मा. अपर पोलीस अधीक्षक, जळगाव परिमंडळ यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी व त्यांचे अधिनस्त सायबर पो.स्टे. चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तपासाचे अनुषंगाने फिर्यादी यांना आलेले मोबाईल कॉल, व्हॉट्स अॅप मॅसेज, तसेच फिर्यादी यांनी ज्या बँक खात्यामध्ये पैसे भरलेले आहेत त्याबाबत संबधीतांकडुन वेळोवेळी आवश्यक ती माहीती प्राप्त करुन तिचे तांत्रिक विश्लेषण करुन त्याव्दारे गुन्हयातील आरोपीतांचा ठावठिकाणा निष्पन्न केला असता सदर आरोपी हे कलकत्ता, पश्चिम बंगाल येथील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मा. पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे आदेशाने सदर गुन्हयातील आरोपी अटक करणेकामी व तपासकामी कलकत्ता, पश्चिम बंगाल येथे दि. 26/04/2023 रोजी पोउपनि दिगंबर थोरात यांचे सोबत पोहेकॉ / राजेश चौधरी, पोना दिलीप चिंचोले, पोकॉ गौरव पाटील असे तपास पथक रवाना झाले होते.

सदर गुन्हयातील आरोपी 1. रिकाडों गोम्स पिता क्रिस्टफर गोम्स, वय 36, 2. प्रियांशु बिसवास पिता सैवाल बिसवास, वय 23, 3. अनिकेत बिसवास पिता अभिजीत बिसवास, वय 24 सर्व रा. रा. 1 बी 3 / 9 प्रांतीक फेज 1, कोलकत्ता येथून ताब्यात घेवून अटक करण्यात आली असुन त्यांचे ताब्यातुन 8 मोबाईल हॅण्डसेट सिमकार्ड सह, 3 संगणक हार्ड डिस्क, 8 ATM Card, 2 चेकबुक, 1 लॅपटॉप, रु.20,000/- रोख, 1 शिक्का असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर तपास पथक आरोपीतांसह दि. 30/04/2023 रोजी जळगांव येथे परत आले आहे.सदर गुन्हयाचे तांत्रिक कामकाज हे सायबर पो.स्टे. येथील पोउपनि / दिगंबर थोरात, पोना/ दिलीप चिंचोले व पोकों / गौरव पाटील यांनी केले आहे.

नागरीकांना जाहीर आवाहन

तरी याव्दारे सायबर पोलीस स्टेशन जळगाव कडून जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, ऑनलाईन सहल (ट्रीप) बुकींग करतांना सदर ट्रॅव्हल्स एजन्सी खरोखर अस्तित्वात व विश्वास आहे अगर कसे याबाबत सविस्तर खात्री करावी. तसेच कुठल्याही अनोळखी व्यक्ती वा अॅपव्दारे ऑनलाईन व्यवहार करणे टाळावेत व ऑनलाईन व्यवहारांचे पासवर्ड नेहमी स्ट्रॉंग ठेवावेत. तसेच कोणी हि अनोळखी व्यक्तींना स्वताः चे नावे बँक खाते तयार करुन देवु नये.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रोजगाराचा नवा मार्ग ; ‘हा’ व्यवसाय करा कमवा चांगले पैसे

Next Post

राज्यातील न्यायालयांचे कामकाज मराठीतून व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Next Post
शेतकरी लाँगमार्च’च्या मागण्यांवर घेतलेल्या निर्णयांची तत्काळ अंमलबजावणी; जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

राज्यातील न्यायालयांचे कामकाज मराठीतून व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us