मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं ‘लोक माझे सांगाती’ भाग 2 या आत्मचरित्राचे प्रकाशन आज झाले. या पुस्तकात अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. याच पुस्तकाच्या माध्यमातून अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन केलेल्या शपथविधीवरही पवार यांनी मोठा खुलासा केला आहे
अजित पवार यांनी केलेल्या बंडाला राष्ट्रवादीचा कसलाही पाठिंबा नव्हता, त्यांनी त्यांच्यासोबत काही आमदार घेऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण तो प्रयोग यशस्वी ठरला नाही.
कारण त्याला राष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा नव्हता. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि नवं सरकार स्थापन झालं असा उल्लेख या आत्मचरित्रामध्ये केला आहे.
हे पण वाचा..
Breaking ! शरद पवार सोडणार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद, केली मोठी घोषणा
शेतकऱ्यांनो धोका गेला नाहीय? पुढील 5 दिवस राज्यातील या जिल्ह्यांना गारपीटीसह मुसळधारचा इशारा
ठरलं.!10वी, 12वी चा निकाल ‘या’ तारखेला जाहीर होणार, कसा आणि कुठं पाहाल निकाल?
शेतकऱ्यांनो.. अवकाळीमुळे पिकाचं नुकसान झालंय?मग टेन्शन सोडा..असा करता येईल विम्यासाठी क्लेम??
या पुस्तकामुळे पुन्हा एकदा पहाटेचा शपथविधी चर्चेत आला आहे. या शपथविधीमागे शरद पवारांचाच हात आहे, अशी चर्चा सुरू होती. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील अप्रत्यक्षरित्या पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार यांचा हात असल्याचं वक्तव्य केलं होतं. यामुळे चर्चेला उधाण आलं. शरद पवार यांनी मात्र याबाबत कधीच कोणती प्रतिक्रिया दिली नाही. परंतु आता त्यांनी आपल्या पुस्तकात याबाबत खुलासा केला आहे.