जळगाव : शेतकऱ्यांवरील अवकाळीचे संकट अद्यापही कायम आहे. हवामान विभागाकडून पुन्हा एकदा पुढील 5 दिवस राज्याच्या अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याला आज मेघगर्जनेसह वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज विदर्भातही धुवांधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. अधिक माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पुढचे २ दिवस तर विदर्भामध्ये पुढचे ३ दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर जळगावमध्ये तुफान पाऊस झाला असून पुढचे काही दिवसही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, नंदूरबार, अहमदनगर आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला असून पुढचे काही दिवस या जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे असणार आहेत.
हे पण वाचा..
ठरलं.!10वी, 12वी चा निकाल ‘या’ तारखेला जाहीर होणार, कसा आणि कुठं पाहाल निकाल?
शेतकऱ्यांनो.. अवकाळीमुळे पिकाचं नुकसान झालंय?मग टेन्शन सोडा..असा करता येईल विम्यासाठी क्लेम??
अवकाळीचा कहर ! जामनेरमध्ये पाचशेहून अधिक मेंढ्यांचा मृत्यू
उर्फी जावेदच्या नव्या करणामाचा VIDEO पाहून लोक झाले चकित!
तसेच पुढील 3 ते 4 दिवसांसाठी मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, सोलापूर, मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.