पुणे : महाराष्ट्रातील बोर्डाच्या दहावी आणि बारावीची झाल्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष निकालाकडे लागून राहते. मात्र अशातच दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दहावी आणि बारावीचे निकाल पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत लागणार आहेत. याबाबत मात्र बोर्डाकडून अधिकारीक माहिती देण्यात आलेली नाही. परंतु अनेक मीडिया रिपोर्टमध्ये दहावी आणि बारावीचे निकाल जून अखेरपर्यंत लागतील अशी माहिती देण्यात आली आहे. यामुळे आता येत्या एका महिन्यात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे.
महाराष्ट्रातील बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झाल्या आहेत. बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत झाल्या असून दहावीच्या परीक्षा या 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान घेण्यात आल्या होत्या. परीक्षा झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे.
कुठं पाहणार निकाल
दहावी आणि बारावीचा निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देता येणार आहे. maharesult.nic.in आणि mahahsscboard.in या दोन वेबसाईटवर जाऊन दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी, परीक्षार्थी आपला रिझल्ट पाहू शकणार आहेत.
हे पण वाचा..
शेतकऱ्यांनो.. अवकाळीमुळे पिकाचं नुकसान झालंय?मग टेन्शन सोडा..असा करता येईल विम्यासाठी क्लेम??
अवकाळीचा कहर ! जामनेरमध्ये पाचशेहून अधिक मेंढ्यांचा मृत्यू
उर्फी जावेदच्या नव्या करणामाचा VIDEO पाहून लोक झाले चकित!
सरकारच्या ‘या’ विभागात सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी.. तब्बल 81100 वेतन मिळेल
कसा पाहता येणार रिजल्ट?
रिझल्ट पाहण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाकडून रिझल्ट डिक्लेअर झाले की वर नमूद केलेल्या दोन संकेतस्थळांपैकी म्हणजेच वेबसाईट पैकी कोणत्याही एका वेबसाईटवर तुम्हाला भेट द्यावी लागेल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर होम पेजवर SSC किंवा HSC रिझल्ट नावाचा पर्याय दिसेल.
यापैकी तुम्हाला ज्या वर्गाचे रिझल्ट पाहायचे आहेत म्हणजे दहावी किंवा बारावी ते सिलेक्ट करायचे आहे. यानंतर तुम्हाला तुमचा वैयक्तिक तपशील म्हणजेच तुमचा सीट नंबर म्हणजेच आसन क्रमांक आणि तुमच्या आईचे नाव टाकायचे आहे. यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे मग तुमचा रिझल्ट तुमच्या स्क्रीनवर दिसेल.