जामनेर : राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. एकीकडे अवकाळीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता जनावरांवरही हे संकट घोंगावत आहे. गारपीट आणि वादळी पावसाच्या तडाख्यात सापडून साडेपाचशे मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना जामनेर तालुक्यातील पिंपळगाव, नांदगाव भागात घडलीय असून या घटनेमुळे मेंढ्या पालन करणाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
जामनेर तालुक्यात मागील काही दिवसापासून गारपिटीसह वादळी पावसाने तडाखा दिला आहे. याच दरम्यान, काल रविवारी पिंपळगाव आणि नांदगाव परिसरात शेत शिवारात वास्तव्यास असलेल्या भगवान कोळेकर आणि सीताराम कोळेकर या मेंढपाळाच्या मेंढ्या वादळात सापडल्या. वादळी वाऱ्यांचा तडाखा जोरदार असल्याने आणि कोणताही आडोसा बाचावासाठी जवळ नसल्याने या मेंढ्या वादळी वाऱ्यात सापडल्या.
हे पण वाचा…
खोलीत सासूला सून दोन पुरुषांसोबत नको त्या अवस्थेत दिसली, मग्..
या फंडामध्ये अवघ्या 3 वर्षात पैसे झाले चौपट ; गुंतवणूकदार झाले मालामाल..
मोठी बातमी! केंद्र सरकारकडून १४ अॅपवर बंदी, बंदी घातलेले अॅप कोणते?
उर्फी जावेदच्या नव्या करणामाचा VIDEO पाहून लोक झाले चकित!
हा तडाखा त्या सहन करू न शकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे मेंढ्या पालन करणाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी, मागणी त्यांनी केली आहे.