सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी आता सुवर्णसंधी आहे. इस्रोमधील विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्येविविध पदांची भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 49 पदं भरण्यात येणार आहेत. ज्या उमेदवारांना या पदांवर नोकरी करायची आहे, त्यांनी काय काळजी घ्यावी, याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार इस्रोच्या अधिकृत वेबसाइट vssc.gov.in किंवा isro.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 4 मे 2023 पासून सुरू होईल, आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 मे 2023 आहे.
कोणत्या पदांसाठी होणार भरती
विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये 49 रिक्त जागांची भरती करण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातेय. त्यामध्ये 43 रिक्त पदं ‘टेक्निशिअन-ए’ पदासाठी, 5 रिक्त जागा ‘ड्रॉफ्ट्समन-बी’ पदासाठी आणि 1 रिक्त जागा ‘रेडिओग्राफर-ए’ पदासाठी आहे.
या तारखेपर्यंत करता येईल अर्ज
इस्रोतील भरती प्रक्रियेसाठी 4 मे 2023 पासून ऑनलाइन अर्ज सुरू करण्यास सुरुवात होणार आहे. तर, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2023 पर्यंत आहे.
हे पण वाचा..
सरकारी नोकरीची उत्तम संधी..! येथे पदवी पाससाठी 1778 पदांवर भरती सुरु
CRPF मध्ये उपनिरीक्षकसह सहायक उपनिरीक्षक पदांसाठी बंपर भरती
पुणे महापालिकेत 10वी ते ग्रॅज्युएशन वाल्यांना सरकारी नोकरीची संधी.. 320 पदासाठी भरती
B.sc पास आहात का? AIIMS तर्फे 3055 पदांसाठी निघाली बंपर भरती, आजच अर्ज करा
शुल्क नाही
इस्रो भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क हे खुल्या व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये आहे. तर, एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क शून्य रुपये आहे.
किती मिळेल पगार?
टेक्निशिअन पदासाठी 21700 ते 69100 रुपये, ड्राफ्ट्समन पदासाठी 21700 ते 69100 रुपये तर रेडिओग्राफर पदासाठी 25500 ते 81100 रुपये वेतनश्रेणी आहे.
इस्रो भरतीसाठी कोण करू शकतो अर्ज?
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांचं वय 35 वर्षं किंवा कमी असावं. उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्रही त्यांच्याकडे असावं.
दरम्यान, सरकारी नोकरी लागावी, यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. विविध स्पर्धा परीक्षांची तयारीसुद्धा करत असतात. त्यातच आता इस्रोमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाल्यामुळे सरकारी नोकरी करण्याची संधी आली आहे. फक्त या साठी दहावी उत्तीर्ण व संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय असणं गरजेचं आहे. या भरती प्रक्रियेची अधिक माहिती vssc.gov.in किंवा isro.gov.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे.