पती नोकरीच्या शोधात परदेशात गेला असता या काळात पत्नी सारखी तिच्या माहेरच्या घरी येऊ लागली. याच दरम्यान, तिचे माहेरकडीलच दोन लोकांशी अनैतिक संबंध सुरू झाले. महिलेने आपल्या दोन्ही प्रियकरांना सासरच्या घरी बोलावले. महिलेच्या सासूने तिघांनाही एका खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. त्यानंतर पोलिसांना बोलावून तिघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
हे आश्चर्यकारक प्रकरण यूपीच्या महाराजगंज जिल्ह्यातील निचलौल पोलीस (Police) स्टेशन परिसरातील गावाशी संबंधित आहे. येथे राहणाऱ्या कुटुंबातील तरुणाचे लग्न शेजारील गावात राहणाऱ्या तरुणीशी झाले होते. लग्नानंतर तरुण नोकरीसाठी सौदी अरेबियाला गेला.
पती परदेशात गेल्यामुळे पत्नीचे माहेरच्या घरी येणे-जाणे जास्त झाले. यादरम्यान तिचे माहेरच्या दोन लोकांशी अवैध संबंध होते. महिला त्यांना भेटण्यासाठी सतत तिच्या माहेरच्या घरी जाऊ लागली.
महिलेने तिच्या दोन्ही प्रियकरांना सासरच्या घरी भेटण्यासाठी बोलावले होते. ते तिघेही रूममध्ये होते. तितक्यात तिथे महिलेची सासू आली आणि तिने खोलीतून येणारे आवाज ऐकून रूमच्या डोकावले. सासूला आपली सून दोन पुरुषांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले आणि तिला मोठा धक्का बसला.
यानंतर सासूने तिघांनाही कुलूप लावून खोलीत बंद केले आणि पोलिसांना फोन केला. पोलीस गावात पोहोचल्यावर महिलेने हा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांसमोरच खोलीचा दरवाजा उघडण्यात आला. सासूने सून आणि दोन्ही तरुणांना पोलिसांच्या ताब्यात दिले.