जळगाव – शहरातील औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी एका तरूणावर काही अज्ञात व्यक्तींनी केलेल्या हल्ल्यात त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पहाटे उघडकीस आली आहे.
शरद विठ्ठल कोळी (वय ३१ रा. रामपेठ, जुने जळगाव) हा रात्री जेवण करून औद्योगीक वसाहतीमधील पॅराडाईज कंझुमर प्रॉडक्ट या कंपनी समोरून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून जखमी केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी संबंधीत कंपनीच्या शिपायाने या घटनेबाबत पोलिसांना कळविल्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक श्री.वाठोरे यांनी पंचनामा केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.