मुक्ताईनगर / भुसावळ – मुक्ताईनगर तालुक्यात कासारखेडा गावाला लागून शेती शिवारात एका 65 वर्षीय इसमाचा खून झाल्याची घटना घडली असून हि घटना दि.२८ च्या मध्यरात्री नंतर घडली असल्याचे समजते. घटनेची माहिती येथील पोलीस पाटील यांनी पोलीसांना कळविली.
खून झालेल्या इसमाचे नाव भिका दयाराम पाटील (वय 65) असून तो शेत मजूर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची तीक्ष्ण हत्याराने अत्यंत क्रूरपध्दतीने हत्या करण्यात आली असून धड व शीर वेगळे केले असल्याचे घटनास्थळी आढळून आले. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही घटनास्थळी मुक्ताईनगर पोलीस,घटनास्थळी फॉरेन्सी व श्वान पथक दाखल झाले आहे.