नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या दरात सतत चढ-उतार होत असतात. जर तुम्ही देखील सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कमी दर ऐकून तुम्ही देखील आनंदी होऊ शकता. सराफा बाजारात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मात्र, आज चांदीच्या दरात संमिश्र कल दिसून आला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा दर घसरला, तर चांदीचा दर वाढला आहे. सराफा बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात घसरण दिसून येत आहे. येत्या काळात सोने 65,000 च्या पुढे जाऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. फेब्रुवारी महिन्यात सोने 55,000 रुपयांपर्यंत घसरले. मात्र त्यानंतर सोन्याच्या किमतीत चढ-उतार होत आहेत. सोन्याच्या वाढीबरोबरच चांदीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. काही महिन्यांत चांदी 80,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज आहे.
शुक्रवारी MCX वर संमिश्र कल
मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरांमध्ये संमिश्र कल दिसून आला. शुक्रवारी दुपारी सोन्याचा भाव 61 रुपयांनी घसरून 59840 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा भाव 49 रुपयांनी वाढून 75329 रुपये प्रति किलोवर होता. याआधी गुरुवारी सोने 59901 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 75280 रुपयांवर बंद झाली होती.
हे पण वाचाच…
राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! यंदाच्या खरीप हंगामासाठी आणखी रासायनिक खत उपलब्ध होणार
जळगावकरांनो काळजी घ्या..! जिल्ह्याला ‘या’ तारखेपर्यंत वादळी पावसाचा इशारा
‘पोळी उलटवण्याची वेळ आली, नाही उलटवली तर…’, शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ
अतिभयंकर! म्हणून भावाला जखमी करून वहिनीला केलं जागीच ठार, पण..
सराफा बाजारात प्रचंड घसरण
इंडिया बुलियन्स असोसिएशन (https://ibjarates.com) द्वारे सराफा बाजार दर दररोज जारी केले जातात. शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 350 रुपयांनी घसरून 60169 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला. चांदीच्या दरातही घसरण दिसून आली आणि तो प्रति किलो 500 रुपयांनी घसरून 73934 रुपये प्रति किलोवर पोहोचला. त्याच दिवशी 23 कॅरेट सोन्याचा भाव 59928 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा भाव 55115 रुपये आणि 20 कॅरेट सोन्याचा भाव 45127 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.