जळगाव । हवामान खात्याकडून जळगावसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा आधीच देण्यात आला होता. त्यानुसार गुरुवारी जळगावसह राज्यातील अनेक भागात गारपिटीसह वादळी पावसाने झोडपून काढलं आहे. यामुळे शेतकरी राजा पुन्हा संकटात सापडला आहे. पुढचे दोन तीन दिवस राज्यावरील अवकाळचे ढग कायम राहणार असून आजही बहुतांश जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्याला ३० एप्रिल पर्यंत अलर्ट जारी?
जळगाव जिल्ह्याला आजपासून 30 एप्रिलपर्यंत वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. आधी झालेल्या अवकाळीने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. यातून शेतकरी सावरत नाही त्यातच अवकाळीचा आणखी तडाखा बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, अवकाळीमुळे जिल्ह्यातील पारा काहीसा घसरला आहे. यामुळे जळगावकरांना उकाड्यापासून दिलासा मिळतोय.
हे पण वाचाच…
‘पोळी उलटवण्याची वेळ आली, नाही उलटवली तर…’, शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ
अतिभयंकर! म्हणून भावाला जखमी करून वहिनीला केलं जागीच ठार, पण..
Jalgaon News : वादळी वाऱ्यामुळे कंटेनरचा आडोसा घेऊन उभे होते, पण.. दोघे जागीच ठार
आज कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट तर कोणत्या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’?
आज हवामान खात्याने पुण्यासह सातारा, सांगली, नाशिक, नगर, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदूरबार, चंद्रपूर, वाशीम, लातूर, बुलडाणा, गडचिरोली, धाराशिव, अकोला, वर्धा या १७ जिल्ह्यांमध्येही पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
तर दुसरीकडे आज शुक्रवारी (२८ एप्रिल) मराठवाडा, विदर्भात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील बीड, नांदेड, यवतमाळ, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, अमरावती, भंडारा, गोंदिया. अवकाळी पाऊसासह जोरदार गाटपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.