शिरूर : नोकरी घालवण्याच्या संशयातून सख्ख्या भावाने टेरेसवर झोपलेल्या भाऊ व वहिनीवर लोखंडी डंबेलने जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात वहिनीचा मृत्यू झाला असून भाऊ गंभीर जखमी झाला आहे. प्रियंका सुनिल बेंद्रे (वय 28, रा. आंब्याचा मळा, आंबळे, ता. शिरूर, जि. पुणे) असे खून झालेल्या वहिनीचे नाव आहे तर सुनिल बाळासाहेब बेंद्रे (रा. आंब्याचा मळा, आंबळे, ता. शिरूर, जि. पुणे) असे हल्ल्याच जखमी झालेल्या भावाचे नाव आहे.
ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये घडलीय. . या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर आरोपीने पळ काढला मात्र गाडीला धडकून तोही ठार झाला.
याप्रकरणी आरोपीचे वडिल बाळासाहेब पोपट बेंद्रे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून अनिल बाळासाहेब बेंद्रे (25, रा. आंब्याचा मळा, आंबळे, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याविरोधात खून व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अनिल हा सुनिल यांचा सावत्र भाऊ आहे. सुनिल व प्रियांका पुण्यामध्ये आयटी कंपनीत कामाला आहेत. १ में रोजी ते लंडनला जॉबसाठी येथे जाणार होते. तसेच अनिल हा एका कंपनीत पुण्यात काम करत होता. मात्र काही महिन्यापूर्वी त्याचे कंपनीतील काम गेले होते. त्यामुळे तो व्यसनाच्या आहारी गेला होता.
दरम्यान, अनिलला या कंपनीचे काम त्याचा भाऊ सुनील याच्यामुळे गेले असा त्याचा समज. आपली नोकरी घालवल्याचा राग भाऊ सुनिलविषयी आरोपीच्या मनात होता. त्यामुळे गावाला येऊन आरोपी अनिल तो सतत आई वडील यांच्याशी भांडणे करीत होता.
हे भांडण सोडवण्याठी तक्रारदार वडील बाळासाहेब बेंद्रे यांनी मुलगा सुनील व सून प्रियांका यांना गावाला आंबळे येथे बोलविले होते. यावेळी त्यांनी आरोपीस समजावले. त्यानंतर जेवण केल्यानंतर प्रियांका व सुनील हे घराच्या टेरेस वरती झोपले. तेव्हा अचानक आरोपी अनिलने व्यायाम करण्याच्या लोखंडी डंबेल, चाकु व विटाने या दोघांवर हल्ला केला व प्रियांका यांच्या छातीवर खोलवर चाकुने पाच वार केले यामध्ये त्यांच्या मृत्यू झाला.
या घटनेनंतर आरोपीने मोटार सायकलवर घटनास्थळावरून पळ काढला यावेळी न्हावरे-चौफुला रस्त्यावर येणाऱ्या स्विफ्ट कारला धडक बसली, त्यात तोही ही गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.