जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगाव क्रीडा विभागाची आंतर महाविध्यालयीन क्रिक्रेट स्पर्धा मुजे महाविध्यालयात सुरु असून ता. २८ रोजी रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाच्या संघाने सहजपणे धनाजी नाना समाजकार्य महाविध्यालयाच्या संघाला नमवत विजेतेपद पटकावले. या सामन्यात रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व कर्णधार स्वप्नील सोनवणे यांच्या ६९ चेंडूत ८४ धावा तसेच आलेश देशमुख यांच्या १८ चेंडूत २४ धावांच्या जोरावर २० षटकात १५८ धावा काढल्या तर धनाजी नाना महाविध्यालयाच्या संघाने १५८ धावांचा पाठलाग करत १२१ धावातच त्यांचा संघ संपुष्टात आला व रायसोनीचा संघ ३७ धावांनी विजयी झाला. यावेळी रायसोनी महाविध्यालयाच्या यश पाटीलने ४ षटकात घेतलेले ४ बळी व त्याने एका षटकात केलेली हॅट्रीक निर्णायक ठरली. विजयी संघाला रायसोनी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संजय जाधव यांचे मार्गदर्शन लाभले असून रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अभियांत्रिकी महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू व आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.