धुळे : मध्य रेल्वेने धुळे-दादर दरम्यान, विशेष रेल्वे गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची नोटीस रेल्वे प्रशासनाने जारी केली आहे. धुळे-दादर एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. त्यामुळे आता धुळेकरांना मुंबईकडील प्रवास सोयीचा होणार आहे. याचा धुळे जिल्ह्यातील नागरिकांना मोठा फायदा होईल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.
नव्याने सुरू होत असलेली गाडी क्रमांक ०१०६५ डाऊन दादर-धुळे एक्सप्रेस ही दादरहून रविवार, सोमवार आणि शुक्रवार सायंकाळी ४.१५ वाजता सुटेल. धुळे स्थानकावर रात्री ११.३५ वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०१०६६ अप धुळे-दादर एक्सप्रेस ही गाडी धुळे येथून सोमवार, मंगळवार व शनिवारी सकाळी ६.३० वाजता सुटेल, तर दादर येथे दुपारी १.१५ वाजता पोहोचेल.
त्यामुळे व्यापारी, नागरीकांना मुंबईत व्यापारानिमीत्त तसेच मंत्रालयात जाण्यासाठी ही गाडी सोईची ठरणार आहे. ही एक्सप्रेस आठवडयातून तीन दिवस धावणार असली तरी प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यास ती दैनंदिन सुरू होऊ शकते.
हे पण वाचा..
शंबर-दोनशे नव्हे.. मुकेश अंबानींनी कर्मचाऱ्याला गिफ्ट केला तब्बल ‘इतक्या’ हजार कोटींचा बंगला
काँग्रेससोबतच्या युतीबाबत गुलाबराव पाटलांचं धक्कादायक वक्तव्य, अनेकांच्या भुया उंचावल्या…
मोठी बातमी! ..तर राजीनामा तयार ठेवा, शिंदेंना दिल्लीतून सूचना?
प्रवासादरम्यान ही गाडी शिरूड, जामदा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिकरोड, इगतपुरी, कल्याण आणि ठाणे स्थानकावर थांबेल. सध्या हे वेळापत्रक संक्षिप्त असून रेल्वे विभाग आपल्या तपशीलवार माहितीमध्ये वेळेत बदलही करू शकतो.