मुंबई : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे केवळ व्यवसाय आणि बँक बॅलन्समध्ये मोठे नाहीत तर ते मनानं देखील खूप मोठे आहे. मुकेश अंबानी यांनी त्यांचे सर्वात जुने कर्मचारी आणि मित्र मनोज मोदी यांना तब्बल 1500 कोटी रुपयांची आलिशान 22 मजली इमारत गिप्ट दिली आहे.
मनोज मोदी यांना मुकेश अंबानींचा उजवा हात म्हटले जाते. मनोज मोदी लाइमलाइट आणि सोशल मीडियापासून दूर राहतात. मनोज मोदी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वात जुने आणि सर्वात विश्वासू आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यांपैकी एक आहेत. मनोज मोदी रिलायन्स जिओ आणि रिटेलचे संचालक आहेत. मनोज मोदी 1980 पासून अंबानींसोबत आहेत. याआधी दोघेही वर्गमित्र राहिले आहेत. त्यांचे आणि अंबानीचे नाते केवळ कार्यालयापुरते मर्यादित नाही. अंबानींच्या घरातही त्यांचा खूप आदर केला जातो. त्यांच्या कार्याबद्दल आदर व्यक्त करत अंबानी कुटुंबाने त्यांना ही अनमोल भेट दिली आहे.
हे पण वाचा..
काँग्रेससोबतच्या युतीबाबत गुलाबराव पाटलांचं धक्कादायक वक्तव्य, अनेकांच्या भुया उंचावल्या…
मोठी बातमी! ..तर राजीनामा तयार ठेवा, शिंदेंना दिल्लीतून सूचना?
अवकाळीचे संकट कायम, जळगावला पुढचे चार दिवस महत्त्वाचे
या आलिशान घराची वैशिष्ट्ये काय आहेत माहीत नाही.
या आलिशान मालमत्तेचे नाव वृंदावन ठेवण्यात आले आहे. हे घर मुंबईतील नेपियन सी रोडवर बांधले आहे. नेपियन सी रोड हा मुंबईचा पॉश एरिया आहे. ही इमारत १.७ लाख स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेली आहे. प्रीमियम ठिकाणी बांधलेल्या या 22 मजली घराचा प्रत्येक मजला 8000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. 7 मजले फक्त कार पार्किंगसाठी राखीव आहेत. इतकेच नाही तर त्यात बसवलेले फर्निचरही खूप खास आहे, जे इटलीतून आयात करण्यात आले आहे. या मालमत्तेची किंमत 1500 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.