मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे. त्यातच दिल्लीतील भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदेसंदर्भात फारसे अस्वस्थ नसल्याचे देखील बोललं जात आहे. तसेच आमदार अपात्रतेचा निर्णय आल्यास राजीनामा तयार ठेवा असं शिंदेंना दिल्लीतून सांगितलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
भाजपचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. शिंदे भाजपला नकोसे झाले असल्याचे देखील बोललं जात आहे. विरोधकांकडून तर मुख्यमंत्री नाराज असल्याचा दावा केला जातोय.
भाजपने एकनाथ शिंदे यांना सोबत घेतले तेव्हा त्यांच्या अपेक्षा अशा होत्या की एक मराठा नेता आपल्यासोबत येत आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातलं राष्ट्रवादी काँग्रेसचं केडर तोडून ते तिथे भाजपला मदत करतील अशी डील झाली असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र एकनाथ शिंदे ठाणे आणि पालघर याच्या पलिकडे जाऊ शकलेले नाही असे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्यावर नाराजी असल्याचे बोललं जात आहे.